विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने आपल्या नवीन अहवालात अदानी समूह आणि सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यात आर्थिक संबंध असल्याचा दावा केला आहे. अदानी मनी सिफनिंग स्कँडलमध्ये वापरल्या गेलेल्या ऑफशोअर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्षांची हिस्सेदारी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तथापि, सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच (Madhabi Puri Buch) यांनी हे आरोप फेटाळले आहेत आणि त्यांनी सांगितले की त्यांनी सेबीमध्ये रुजू होण्यापूर्वी केवळ दोन वर्षांपूर्वीच फंडातील गुंतवणूक केली होती. या आरोप-प्रत्यारोपांमध्ये माधबी पुरी कोण आहेत आणि त्यांनी कोणत्या पदांवर काम केले आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
SEBI प्रमुख माधबी पुरी कोण आहेत?
माधबी पुरी या 1 मार्च 2022 पासून भारतातील बाजार नियामक अर्थात SEBI च्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून शिक्षण घेतले आहे आणि सेबीच्या सर्वात तरुण प्रमुख आहेत. यापूर्वी, त्या सेबीच्या पूर्णवेळ सदस्य होत्या आणि बाजार नियमन, गुंतवणूक व्यवस्थापन आणि आयटी संबंधित विभागांचे कामकाज पाहत होत्या. रिपोर्टनुसार, माधबी पुरी बुच यांनी 1989 मध्ये आयसीआयसीआय बँकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली.
1993 ते 1995 दरम्यान, माधबी पुरी बुच यांनी वेस्ट चेशायर कॉलेज, इंग्लंडमध्ये लेक्चरर म्हणून काम केले. यानंतर त्यांनी 12 वर्षे अनेक कंपन्यांच्या विक्री, विपणन आणि उत्पादन विकास विभागात काम केले.
ब्रिक्स बँकेतही सल्लागार
2013 ते 2017 पर्यंत त्यांनी ब्रिक्स देशांच्या गटाने तयार केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकेत सल्लागार म्हणून काम केले. यानंतर, 2017 मध्ये, त्यांची सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2018 मध्ये त्यांनी सहारा समूहाविरोधात आदेश पारित केला होता. 2022 मध्ये त्यांनी सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
माधबी पुरी यांचा जन्म 1966 मध्ये झाला होता. माधबी पुरी बुच यांनी त्यांचे शालेय शिक्षण मुंबई आणि दिल्ली येथे केले. डीयूच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी गणिताचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी आयएमएम अहमदाबादमधून शिक्षण घेतले.
Donald Trump : इराणी हॅकर्सचा ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारावर हल्ला; उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार वेन्स यांच्याशी संबंधित माहिती चोरली
कोण आहे धवल बुच?
माधबी पुरी बुच यांचे पती धवल बुच हे अनुभवी व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. अहवालानुसार, धवल बुच सध्या ब्लॅकस्टोन आणि अल्वारेझ आणि मार्स येथे वरिष्ठ सल्लागार आहेत. ते गिल्डनच्या बोर्डावर बिगर कार्यकारी संचालक म्हणूनही काम करतात. धवल बुच यांची युनिलिव्हरमध्ये तीन दशकांची कारकीर्द आहे. धवल बुच यांनी आयआयटी दिल्लीतून शिक्षण घेतले आहे. त्यांनी 1984 मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती.
दाम्पत्याने आरोप फेटाळून लावले
बुच दाम्पत्याने हिंडेनबर्ग यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की त्यांनी 2015 मध्ये 360 वन ॲसेट अँड वेल्थ मॅनेजमेंट (पूर्वीचे IIFL वेल्थ मॅनेजमेंट) द्वारे व्यवस्थापित IPE प्लस फंड 1 मध्ये गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक त्यांनी सिंगापूरमध्ये खासगी नागरिक म्हणून राहत असताना माधवी यांनी पूर्णवेळ सदस्य म्हणून सेबीमध्ये सामील होण्याच्या दोन वर्षांपूर्वी केली होती. निवेदनानुसार, मुख्य गुंतवणूक अधिकारी अनिल आहुजा हे धवल यांचे शालेय आणि IIT दिल्लीतील बालपणीचे मित्र असल्याने आणि Citibank, JP Morgan आणि 3i Group PLC चे माजी कर्मचारी म्हणून अनेक दशकांचा अनुभव असल्यामुळे, फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
‘आमचे जीवन हे एक खुले पुस्तक आहे’
हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावत सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी रविवारी सकाळी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 10 ऑगस्ट रोजी हिंडेनबर्ग अहवालात केलेले आरोप निराधार आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही. आमचे जीवन हे खुल्या पुस्तकासारखे आहे. आमची काही माहिती हवी होती, ती सर्व माहिती गेल्या काही वर्षांत SEBI ला देण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App