आफताब केसमध्ये घुमवा फिरवी; श्रद्धाची हत्या केल्याची आफताबची कोर्टात कबूली; पण वकिलाचा मात्र इन्कार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पण आरोपी आफताब अमीन पूनावालाच्या बाजूने मात्र केसमध्ये घुमवा फिरवी सुरू आहे. रागाच्या भरात श्रद्धाचा खून केल्याची कबुली आफताबने कोर्टात दिली, पण त्याच्या वकिलांनी तशी कबूली आफताबने दिली नसल्याचा दावा केला आहे. love jihad aftab-sharadhha murder case

रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबनं न्यायाधीशांसमोर कबूल केले.. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा आफताबला कोर्टात हजर केले तेव्हा त्याने ही कबुली दिली. आफताबच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ करण्यात आली.

आफताबची काल पॉलिग्राफ टेस्टही केली. आफताब चौकशीत अनेक प्रश्नांची उत्तर चुकीची देतोय. त्यामुळे आफताबची नार्को टेस्ट केली जाणार आहे. पण पॉलिग्राफ झाल्यानंतरच नार्को टेस्ट करण्यात येते. त्यासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी मिळाली आहे.

 आफताब कुटुंबियांना भेटणार

आफताबला त्याच्या कुटुंबियांना भेटण्याची कोर्टाने परवानगी दिली आहे. यासाठी आफताबच्या वकिलांनी कोर्टाकडे विनंती केली होती. आफताबला त्याच्या कुटुंबियांना भेटण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती वकिलांनी कोर्टात केली. यावर कोर्टाने परवानगी दिली आहे. आफताबचे वकिल अविनाश यांनी केलेल्या दाव्यानुसार आफताबचे कुटुंब बेपत्ता नाही. एक ते दोन दिवसात ते त्याच्या कुटुंबाशी संपर्क करतील. आफताब चौकशीत सहकार्य करत असल्याचा दावाही आफताबच्या वकिलांनी केला आहे. ज्या जंगलात त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फेकले, त्या जागेची माहिती आफताबने पोलिसांना दिल्याचे वकिल अविनाश कुमार यांनी म्हटले आहे.



 

आफताबचा वकिलांचा धक्कादायक दावा

मात्र, आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली कोर्टात दिली नसल्याचा दावा अविनाश कुमार यांनी केला आहे. जे काही घडले ते रागाच्या भरात घडले असावे. याचाच अर्थ त्याला कोणीतरी भडकले असावे किंवा या पूर्ण प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीचा समावेश असावा, असा दावा अविनाश कुमार यांनी कोर्टात केला आहे.

पोलिसांची सर्वात मोठी शोध मोहीम

श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आता सर्वात मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. श्रद्धाच्या हत्येच्या तपासात पुढचे 100 तास महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच दिल्ली पोलिसांची 200 जणांची सर्वात मोठी टीम तयार करण्यात आली आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते जंगलात आणि तलावात फेकण्यात आले होते. त्यामुळे हे तुकडे शोधण्याचं सर्वात मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. आतापर्यंत श्रद्धाचा जबडा तसेच 18 हाडे सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे अवशेष तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आफताबच्या मोबाईलच्या लोकेशनच्या आधारावर पोलिसांनी एक नकाशा तयार केलाय. तो जिथे जिथे गेलाय त्या घटनास्थळावर पोलीस शोध घेणार आहेत.

आफताब 4 मोबाईल नंबर वापरत होता

आफताब पुनावाला हा 4 मोबाईल नंबर वापरत होता अशी धक्कादायक माहिती आता समोर येतेय. 4 वेगवेगळे नंबर आफताबकडे आढळून आले आहेत. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवले. फ्रिज मागवण्यासाठी जो नंबर आफताबने वापरला तो श्रद्धाच्या नावावर असल्याची माहितीही समोर येतेय. विशेष म्हणजे फेसबुकचं लॉग इन करण्यासाठी श्रद्धा हाच मोबाईल वापरत होती. श्रद्धाच्या फेसबुक अकाऊंट आणखी एका नंबरसोबतसुद्धा लिंक होते. त्याच्या फेसबुक आयडीसोबतही दोन नंबर लिंक होते. त्यामुळे आफताब दोन मोबाईल नंबरवरुन फेसबुक अकाऊंट वापरत होता.

love jihad aftab-sharadhha murder case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात