राहुल गांधींनी देशाची माफी मागावी; हिमाचलचे माजी मुख्यमंत्री शांता कुमारांनी जागविल्या सावरकर भेटीच्या आठवणी


वृत्तसंस्था

पालमपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अवमानकारक उद्गार काढल्याबद्दल त्यांच्यावर संताप व्यक्त करून हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वयोवृद्ध भाजप नेते शांता कुमार यांनी त्यांना देशाची माफी मागावी अन्यथा त्यांची भारत जोडो यात्रा भारत अपमान यात्रा ठरेल, असा इशारा दिला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करताना शांता कुमार यांनी आपल्या स्वतःच्या सावरकर भेटीच्या आठवणी जागवल्या आहेत.
Former Himachal Chief Minister Shanta Kumar evoked memories of Savarkar’s visit

70 वर्षाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात आणि 60 वर्षाहून अधिक काळ राजकारणात असलेले शांत कुमार हिमाचलचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत. सध्या ते 90 वर्षांचे आहेत आणि पुस्तक लेखन तसेच योग प्रसारात मग्न आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. आपल्या युवा अवस्थेत शांता कुमार यांनी स्वातंत्र्यलढ्यावर पुस्तक लिहिले होते. त्यावर सावरकरांनी भूमिका लिहावी म्हणून त्यांनी मुंबईत येऊन सावरकरांची भेट घेतली होती. त्यावेळच्या भेटीच्या आठवणी शांताकुमार यांनी जागवल्या आहेत.


Russia – Savarkar – Nehru : सावरकरांनंतर नेहरूंवर ट्विट करण्याची संजय राऊतांची राजकीय कसरत!!


त्यावेळी अनेक क्रांतिकारक ब्रिटिशांना चकवा देण्यासाठी तथाकथित माफीपत्रे लिहीत असत. ब्रिटिश देखील राजकीय परिस्थिती पाहून त्यांची माफीपत्रे प्रकाशित करून त्यांना सोडून देत असत. परंतु तुरुंगातून सुटल्यानंतर हे क्रांतिकारक नंतर गुप्तपणे वेगवेगळ्या चळवळींमध्ये सामील होत असत, अशी आठवण शांत कुमार यांनी सांगितली.

सावरकरांनी लिहिलेले 1857 चे स्वातंत्र्य समर ही क्रांतिकारकांसाठी स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा होती. ब्रिटिशांना त्या ज्वालाग्रही ग्रंथाची धग लक्षात आल्यानंतर ते प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यांनी त्यावर बंदी घातली. पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच बंदी घातलेले जगातले ते एकमेव उदाहरण होते, याची आठवण शांता कुमार यांनी करून दिली.

राहुल गांधींनी देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास वाचावा. त्याचे व्यवस्थित अध्ययन करावे अन्यथा काय बोलू नये. कारण त्यांच्या बोलण्यातून सर्वच स्वातंत्र्ययोद्ध्यांचा अपमान होतो. त्यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे त्या यात्रेचे रूपांतर भारत अपमान यात्रेत होईल, असा इशारा शांता कुमार यांनी दिला आहे.

Former Himachal Chief Minister Shanta Kumar evoked memories of Savarkar’s visit

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात