प्रतिनिधी
पुणे : हिंदू मुली सध्या लव्ह जिहादला बळी पडत आहेत, पण त्यांना धर्मशिक्षण दिल्यावर त्या त्यापासून सुरक्षित राहतील, मात्र त्यासाठी हिंदूंनी जातपात न बाळगता हिंदू धर्माविषयी चर्चा करायला हवी, असे मत अमृताश्रम स्वामी महाराज यांनी आळंदी येथे आयोजित वारकरी महाअधिवेशनात मांडले. महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी आणि लव्ह जिहाद विरोधी कायदे मंजूर करावेत, असा ठराव या महाअधिवेशनात संमत करण्यात आला. Enact anti-conversion and anti-love jihad laws in Maharashtra
आळंदी येथे देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य राज्यव्यापी 16 वे वारकरी महाअधिवेशन’ भावपूर्ण वातावरणात पार पडले. या अधिवेशनात महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा आणि लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात यावा, गड आणि दुर्ग यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवावी अशी वारकऱ्यांनी एकमुखी मागणी केली. या महाअधिवेशनात 16 ठराव संमत करण्यात आले.
हिंदूंनी स्वतःची ताकद दाखवावी
या अधिवेशनात बोलतांना ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ म्हणाले की, हिंदूंवरील आघातांच्या विरोधात हिंदू जागृत झाला पाहिजे, गोहत्या बंदी कायदा झालाच पाहिजे. गोरक्षकांच्या पाठीशी उभे राहून हिंदूंनी स्वतःची ताकद दाखवून दिली पाहिजे. द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदासजी महाराज लहवितकर म्हणाले की, कीर्तनकारांनी संप्रदायाची आचारसंहिता बाळगून कीर्तनातून धर्माचे ज्ञान दिले पाहिजे. शालेय अभ्यासक्रमात संत आणि धर्मशास्त्र अभ्यासक्रमाचा समावेश केला पाहिजे. योगीदत्तनाथ महाराज म्हणाले की, कीर्तनकारांनी हिंदू देवता, धर्म आणि वाङमय यांचे शिक्षण देऊन हिंदुंना जागृत करावे. हिंदू देवतांचे विडंबन आणि टीका करणार्यांना कडाडून विरोध करावा. कीर्तनातून कीर्तनकरांनी हिंदू धर्म आणि हिंदू यांच्यावर होणार्या अत्याचारांची माहिती दिली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App