विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA 298 जागा मिळवून तिसऱ्यांदा सत्तेवर आली आहे. परंतु भाजपला त्यातल्या 242 जागा मिळाल्याने त्यांचा “पराभव” झाला आहे. त्या उलट INDI आघाडीला 228 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला 100 जागा मिळाल्याने काँग्रेसचा “विजय” झाला, असे अजब तर्कट राहुल गांधींनी आज दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत लढविले. Loksabha elections 2024 results congress win
2014 आणि 2019 या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला अनुक्रमे 44 आणि 54 अशा डबल डिजिट जागा मिळाल्या पण 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसने 100 आकडा गाठल्याने राहुल गांधींनी हर्षभरीत होऊन आज प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी उत्तर प्रदेश मधल्या मतदारांचे विशेष करून आभार मानले. उत्तर प्रदेशच्या जनतेने देशाच्या राजकारणाची नजाकत समजून काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला भरभरून मतदान केले. त्यामुळे देशाची राज्यघटना बचावली, असे उद्गार राहुल गांधींनी काढले.
#WATCH | Congress leader Rahul Gandhi says, "UP ki janta ne kamaal karke dikha diya…The people of UP understood the politics of the country and the danger to the Constitution, and they safeguarded the Constitution. I thank them for supporting Congress party and INDIA… pic.twitter.com/hNxvqRNjp2 — ANI (@ANI) June 4, 2024
#WATCH | Congress leader Rahul Gandhi says, "UP ki janta ne kamaal karke dikha diya…The people of UP understood the politics of the country and the danger to the Constitution, and they safeguarded the Constitution. I thank them for supporting Congress party and INDIA… pic.twitter.com/hNxvqRNjp2
— ANI (@ANI) June 4, 2024
त्याच वेळी राहुल गांधींनी इथे मागे लपलेली प्रियांका गांधी हिचे उत्तर प्रदेश मधल्या काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या विजयामध्ये खूप मोठे योगदान आहे, असे आवर्जून सांगितले त्यामुळे राहुल गांधी रायबरेलीची जागा सोडून वायनाडची जागा स्वतःकडे ठेवणार आणि त्या रायबरेलीच्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधींना उभे करून निवडून आणणार, असे सूचित झाले आहे.
परंतु राहुल गांधींनी या प्रेस कॉन्फरन्स मध्ये जे अजब तर्कट मांडले, ते म्हणजे भाजपला मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, मग भले त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित NDA आघाडीला 298 जागा मिळून पूर्ण बहुमत मिळाले असेल, तरी भाजपचा पराभव झाला आहे म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, असे राहुल गांधी म्हणाले. त्याचवेळी काँग्रेस पक्षाला 100 जागा मिळाल्याबद्दल त्यांनी काँग्रेस सह स्वतःची पाठ थोपटून घेतली. यावेळी त्यांच्या शेजारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे बसले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App