विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका IAS अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली आहे. IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या 27 वर्षीय मुलीने इमारतीच्या 10व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. लिपी रस्तोगी असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. IAS officer’s daughter commits suicide in Mumbai; Ended life by jumping from 10th floor, suicide note also found
आत्महत्येमागेचे नेमके कारण अस्पष्ट
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयासमोरच्या सुनीती इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून तिने उडी मारली. याच मजल्यावर विकास रस्तोगी राहत असल्याची माहिती आहे. मध्यरात्री 3 च्या सुमारास ही घटना घडली आहे. या आत्महत्येमागेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली चिठ्ठी
दरम्यान, 10 व्या मजल्यावरुन उडी मारल्यानंतर ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली. तिथेच तिचा जागीच मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे. त्यातून काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सध्या पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी तपास सुरू आहे. मात्र ती नैराश्यात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
LLB चे शिक्षण घेत होती लिपी
लिपी LLB चे शिक्षण घेत होती. तर तिचे वडील विकास रस्तोगी हे शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर आहेत. तिचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी कफ परेड पोलिस मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. विकास रस्तोगी शिक्षण विभागात सचिव आहेत तर त्यांच्या पत्नी राधिका रस्तोगी चलन विभागात सचिव आहेत. त्यामुळे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App