सुरत पाठोपाठ इंदोर मध्ये काँग्रेसची ससेहोलपट; अक्षय कांती बमने घेतली लोकसभेची उमेदवारी वापस!!

विशेष प्रतिनिधी

इंदोर : राहुल गांधी + प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांच्या काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी आकाश पाताळ एक केले असले, तरी प्रत्यक्षात देशात सर्वत्र त्यांच्या काँग्रेसची पूर्ण ससेहोलपट चालू आहे आणि ती रोखण्यात त्यांना अपयश येताना दिसत आहे.Lok Sabha elections 2024: Big setback to Congress! Akshay Bam withdraws nomination from Indore, joins BJP

गेल्याच आठवड्यात सुरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेऊन तिथल्या भाजप उमेदवाराला बिनविरोध जिंकू दिले. त्यावरून काँग्रेस नेत्यांनी प्रचंड आरडाओरडा केला, पण त्याचा काही फायदा झाला नाही. कालच दिल्लीत दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अरविंद सिंह लवली यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये मोठा राजकीय बॉम्बस्फोट केला.



काँग्रेस मधला आजचा राजकीय बॉम्बस्फोट मध्य प्रदेशातल्या इंदोर मध्ये झाला. इंदूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्या पाठोपाठ भाजपा कार्यालयात जाऊन पक्षप्रवेश केला.

अक्षय कांती बम यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितले होते. काँग्रेसने त्यांना तिथे तिकीट दिले नाही, त्या उलट इंदोर मध्ये विद्यमान खासदार शंकर ललवाणी यांच्या विरोधात लोकसभेचे तिकीट दिले 25 एप्रिल रोजी अक्षय कांती बम यांनी फॉर्म भरला. परंतु गेल्या 4 दिवसांत भाजपच्या नेत्यांनी अशा काही घडामोडी केल्या की काँग्रेसला भनक लागायच्या आतच कैलास विजयवर्गीय यांनी गेम टाकून अक्षय कांती बम यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली आणि पाठोपाठ आपल्या गाडीत घालून भाजपाच्या कार्यालयात नेले. तिथे त्यांचा पक्षप्रवेश केला. या सगळ्या घडामोडीचे ट्विट कैलास विजयवर्गीय यांनीच केले. त्यानंतर इंदूर मधले दुसरे उमेदवार मोती सिंह पटेल यांचाही फॉर्म रद्द झाला.

मात्र अक्षय कांती बम यांची उमेदवारी मागे घेण्याची सगळी विवरचना रविवारीच निश्चित झाली होती. त्यांनी रविवारी इंदूरच्या चंदन नगर मध्ये प्रचार करताना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी फॉर्मवर स्वतंत्र उमेदवार म्हणूनच उल्लेख केल्याचा संशय काँग्रेस नेत्यांना आला. परंतु मूळात अक्षय कांति बम यांची उमेदवारी स्वतः जितू पटवारी यांनीच लक्ष घालून निश्चित केल्याने त्यांनी अक्षय बम यांच्या घोषणाकडे दुर्लक्ष केले. परिणामी इंदूर सारख्या अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघात काँग्रेसची पुरती नाचक्की झाली.

Lok Sabha elections 2024: Big setback to Congress! Akshay Bam withdraws nomination from Indore, joins BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात