तामिळनाडूत स्टालिन सरकारचा १००० कोटींचा दारू घोटाळा, केरळ मध्ये सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्टच ड्रग्स माफिया; पण दोन्हीकडे हिंदी द्वेषाचा धुरळा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तामिळनाडू 1000 कोटींचा दारू घोटाळा, केरळमध्ये सत्ताधारीच ड्रग्स माफिया; पण दोन्हीकडे हिंदी द्वेषाचा धुरळा उडवून सत्ताधारी पक्ष खुर्च्या उबवत बसले आहेत. Tamilnadu – Kerala

तामिळनाडू मध्ये मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या सरकारने हिंदी द्वेष करण्याची पराकोटी गाठत ₹ हे चिन्ह बजेट वरून हटवून टाकले. त्यांच्या मंत्र्यांनी हिंदी द्वेष करताना उत्तर भारतीयांविरुद्ध गरळ ओकली. तमिळनाडू विधानसभा निवडणुका जिंकता याव्यात यासाठी हिंदी आणि हिंदू द्वेषाची पिलावळ पोसली गेली. तामिळनाडूने केंद्र सरकारचे त्रिभाषा धोरण नाकारले. या धोरणाविरोधात एम. के. स्टालिन यांनी गैरहिंदी भाषिक मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली. पण त्यांना अल्प प्रतिसाद मिळाला.

पण याच स्टालिन सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये 1000 कोटी रुपयांचा दारू घोटाळा केला. दारूच्या प्रत्येक बाटली मागे १० ते ३० रुपये जास्त उकळणे, दारूची टेंडर देताना लाचखोरी करणे, अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना त्या लाचखोरीतला पैसा वापरणे हे सगळे प्रकार तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (TASMAC) या सरकारी नियंत्रणाखालच्या महामंडळातून झाले. ही अफरातफरी मधली रक्कम दिल्ली दारू घोटाळ्यासारखी २०० कोटी रुपयांची नव्हे, तर तब्बल 1000 कोटी रुपयांची निघाली. ईडीने त्या संदर्भात तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशनच्या वेगवेगळ्या कार्यालयांवर छापेमारी केली. त्यानंतर एफआयआर दाखल केले. या एफआयआर मधूनच 1000 कोटींचा दारू घोटाळा झाल्याचे उघड झाले.



एकीकडे तामिळनाडूतला 1000 कोटी रुपयांचा दारू घोटाळा उघड झाला असताना, दुसरीकडे केरळमध्ये सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी शाखा स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या (SFI) म्होरक्यांचा ड्रग्स घोटाळा उघड झाला. केरळ मधल्या अनेक महाविद्यालयांमध्ये ड्रग्स साठे सापडले. त्याचबरोबर कंडोमची पाकीटे सापडली. या सगळ्या वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी अडकले. पण पोलिसांनी त्यांच्यावर जुजबी कारवाई केली. म्हणून संतापलेल्या केरळ प्रदेश काँग्रेसने तिथल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकार विरोधात राज्यभर आंदोलन केले.

पण केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ड्रग्स घोटाळ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्या उलट त्यांनी स्टालिन यांच्याच सुरात सूर मिसळत हिंदी द्वेष वाढविण्याचे काम केरळमध्ये केले. केरळ सरकारने देखील त्रिभाषा धोरण नाकारले. पिनराई विजयन स्टालिन यांच्याबरोबरच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Liquor scam in Tamilnadu, drugs scam in Kerala

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात