धर्मांतर प्रकरणात कोणतीही व्यक्ती एफआयआर दाखल करू शकते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मंगळवारी उत्तर प्रदेश विधानसभेत लव्ह जिहाद संदर्भातील विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकात लव्ह जिहादचा आरोप करणाऱ्यांना जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे. लव्ह जिहाद अंतर्गत अनेक गुन्ह्यांचाही समावेश आहे. योगी सरकारने हे विधेयक सभागृहात मांडले होते.Law passed on Love Jihad’ in Uttar Pradesh Legislative Assembly provision of life imprisonment for the accused
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने 2020 मध्ये लव्ह जिहादविरोधात पहिला कायदा केला. यानंतर, सरकारने विधानसभेत धर्म परिवर्तन बंदी विधेयक 2021 मंजूर केले होते, ज्यामध्ये 1 ते 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद होती. केवळ विवाहासाठी केलेले धर्मांतर बेकायदेशीर मानले जाईल, अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशनंतर आता उत्तराखंडमध्येही कावड मार्गावरील दुकानांवर मालकाचे नाव लिहावे लागणार, आदेश जारी
20 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद
नवीन विधेयकानुसार, नवीन कायद्यानुसार दोषी आढळल्यास आरोपीला 20 वर्षांचा कारावास किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. धर्मांतर प्रकरणात कोणतीही व्यक्ती एफआयआर दाखल करू शकते. यापूर्वी, माहिती किंवा तक्रार नोंदवण्यासाठी पीडित, पालक किंवा भावंडाची उपस्थिती आवश्यक होती.
सत्र न्यायालयाखालील कोणतेही न्यायालय लव्ह जिहाद प्रकरणांची सुनावणी करणार नाही. अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. लव्ह जिहाद प्रकरणात सरकारी वकिलाला संधी दिल्याशिवाय जामीन अर्जावर विचार केला जाणार नाही. सर्व गुन्हे अजामीनपात्र आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App