या प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू यादव यांना लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणी मोठा झटका बसला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात लालूंचे निकटवर्तीय अमित कात्याल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.Land For Job Scam Court custody of Lalu Yadavs close associates ED was arrested
मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित या प्रकरणात कारवाई करताना ईडीने 11 नोव्हेंबर रोजी लालूंचे निकटवर्तीय अमित कात्याल यांना अटक केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बुधवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने अमित कात्यालला ५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अमित कात्याल हे व्यापारी आहेत. नोकरीसाठी जमीन खरेदी प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रकरणी अमित यांच्या कंपनीचे नाव पुढे आले होते. यापूर्वी न्यायालयाने अमित कात्यालला १६ नोव्हेंबरपर्यंत केंद्रीय एजन्सीच्या कोठडीत पाठवले होते. ईडी आणि सीबीआय याची चौकशी करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App