Mahakumbh : दिल्ली दुर्घटनेवरून संतापलेल्या लालूंचे ‘महाकुंभ’बद्दल वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

Mahakumbh

रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळेच इतक्या लोकांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी, असंही लालू प्रसाद यादव म्हणाले आहेत.


नवी दिल्ली:Mahakumbh  देशाचे माजी रेल्वे मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांनी कुंभमेळ्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले, तर कुंभमेळा विनाकारण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लालू म्हणाले ”कुंभ म्हणजे काय? फालतू आहे कुंभ.”Mahakumbh

लालू प्रसाद यादव यांनी चेंगराचेंगरीची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आणि पीडितांप्रती मी संवेदना व्यक्त करतो असे म्हटले. त्यांनी या अपघातासाठी पूर्णपणे रेल्वेला जबाबदार धरले आणि म्हटले की रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळेच इतक्या लोकांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी.



शनिवारी रात्री उशिरा दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १४ महिलांसह एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आणि १२ हून अधिक लोक जखमी झाले. प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती, ज्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली.

पोलिस उपायुक्त (रेल्वे) यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, जेव्हा प्रयागराज एक्सप्रेस ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर उभी होती, तेव्हा तिथे आधीच लोकांची मोठी गर्दी होती. अधिकाऱ्याने सांगितले की, स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस उशिराने धावत होत्या आणि या गाड्यांमधील प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक १२, १३ आणि १४ वर देखील उपस्थित होते. तसेच “रेल्वेकडून दर तासाला सुमारे १,५०० सामान्य तिकिटे विकली जात होती, त्यामुळे स्थानकावरील गर्दी वाढली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली,” असे ते म्हणाले. प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १६ जवळील एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली. ही घटना रात्री ९.५५ च्या सुमारास घडली, त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे मी दु:खी आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. जखमींना लवकर बरे वाटावे अशी मी प्रार्थना करतो.”

Lalus controversial statement about Mahakumbh angered by Delhi tragedy

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात