महाराष्ट्रात love jihad विरोधात कायदा का??; फडणवीसांनी सांगितले दाहक वास्तव आणि कायद्याची गरज!!

विशेष प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्रात love jihad विरोधी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केल्यानंतर काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांच्या नेत्यांनी आगपाखड केली. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात love jihad विरोधी कायदा का करावा लागतोय?? या संदर्भातले दाहक वास्तव आणि कायद्याची गरज विशद करून सांगितली.

नागपूर मध्ये पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले :

– देशातल्या love jihad च्या घटनांची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली. त्यातले भयानक वास्तव सुप्रीम कोर्टाने मान्य करून त्या घटनांना अटकाव करण्यासाठी उपाय योजना करायला सरकारला बजावले. केरळ हायकोर्टाने देखील यासंदर्भात काही निकाल दिले.

– समाजामध्ये एका धर्मातल्या व्यक्तीने दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीशी विवाह करणे गैर नाही. परंतु खोटे बोलणे, खोटे बोलून, खोटी आयडेंटिटी तयार करून फसवून लग्न करणे हे प्रकार समाजात वाढत आहेत. खोटे बोलून, फूस लावून लग्न करायचे, मुले जन्माला घालायची आणि नंतर सोडून द्यायचे या घातक प्रवृत्ती समाजामध्ये वाढत चालल्यात. त्यांना काही घटक खतपाणी घालत आहेत. या सगळ्यांना अटकाव करण्यासाठी महाराष्ट्रात love jihad विरोधातला कायदा करणे आवश्यक आहे. त्यासाठीच समिती गठित केली आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती पावले उचलून महाराष्ट्रात love jihad विरोधात कायदा करून तो अंमलात आणू.

Why is there a law against love jihad in Maharashtra?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात