वृत्तसंस्था
कोलकाता : कोलकाता बलात्कार ( Kolkata Rape Case ) आणि हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने बंगालमधील कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत हजर राहण्याचा अल्टिमेटम दिला आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले की, मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत डॉक्टर ड्यूटीवर परतले तर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. न परतल्यास राज्य सरकार शिस्तभंगाची कारवाई करू शकते.
आयएमएने (इंडियन मेडिकल असोसिएशन) म्हटले की, आम्ही कनिष्ठ डॉक्टरांसोबत आहोत. हा विरोध संपणारा नाही. येत्या काही दिवसांत तो आणखी तीव्र होणार आहे. पीडितेला लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. त्याच वेळी, कोर्टाने सांगितले की, अद्याप या प्रकरणाचा कोणताही चालान अहवाल आला नाही, ज्याच्या आधारावर शवविच्छेदन केले जाते. चालान अहवालाशिवाय शवविच्छेदन करण्यात आले का? अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत राज्य सरकारच्या उत्तरावर न्यायालयाने सांगितले की, ३,७०० सीसीटीव्ही आधीच कार्यरत आहेत. मग घटना का घडली? पुढील सुनावणी १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. ३० दिवसांच्या तपासानंतर आतापर्यंत फक्त एक आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली आहे. तर १२ पॉलीग्राफ चाचण्या आणि सुमारे १०० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
कुटुंबीयांना पैसे देण्याची ऑफर केली नाही- ममता
मुलीचा मृतदेह समोरअसताना एका वरिष्ठ पोलिसाने पैशांची ऑफर दिल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला. मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, हे नाटक आहे. पीडित कुटुंबाने पुरावे द्यावेत. पीडितेची आई म्हणाली, ममता खोटे बोलत आहेत. नुकसान भरपाईबाबत म्हटले होते. मग मी म्हणाले, मला न्याय मिळाल्यावर मी तुमच्या कार्यालयात येऊन भरपाई घेईन.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App