G20 परिषदेपूर्वी दिल्लीला बदनाम करण्याचे षडयंत्र, पाच मेट्रो स्थानकांवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा!


या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत पुढील महिन्यात होणाऱ्या G20 शिखर परिषदेपूर्वी एक मोठी घटना समोर आली आहे. दिल्लीला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. राजधानीतील पाच मेट्रो स्थानकांवर आक्षेपार्ह घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. मात्र, या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. Khalistan slogans written on five metro stations, plot to defame Delhi ahead of G20 summit

G20 शिखर परिषदेच्या अगोदर, शीख फॉर जस्टिस (SFJ) ने दिल्ली मेट्रो स्थानकांचे फुटेज जारी केले आहे जेथे खलिस्तान समर्थकांचे नारे लिहिले आहेत. दिल्लीतील शिवाजी पार्कपासून पंजाबी बागपर्यंत अनेक मेट्रो स्थानकांवर खलिस्तान समर्थकांचे नारे लिहिण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

पाचहून अधिक मेट्रो स्थानकांवर कोणीतरी ‘दिल्ली बनेगा खलिस्तान आणि खलिस्तान जिंदाबाद’ लिहिल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. त्यावर दिल्ली पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत G20 शिखर बैठक होणार आहे.

Khalistan slogans written on five metro stations plot to defame Delhi ahead of G20 summit

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात