आणखी ७ दिवसांची कोठडी हवी असल्याचेही म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्यातील केजरीवाल यांची कोठडी संपल्यानंतर, ईडीने गुरुवारी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर केले, जिथे त्यांच्या पुढील रिमांडबाबत सुनावणी सुरू आहे.Kejriwal is not even telling the password of the device ED alleged
ईडीच्या वतीने एसव्ही राजू न्यायालयात युक्तिवाद करत आहेत. तर अरविंद केजरीवाल यांच्यावतीने रमेश गुप्ता युक्तिवाद करत आहेत. सुनावणीवेळी सुनीता केजरीवालही कोर्ट रूममध्ये हजर होत्या. यादरम्यान एसव्ही राजू यांनी आरोप केला आहे की, ‘मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल डिव्हाइसचे पासवर्डही उघड करत नाहीत. ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
ईडीने कोर्टात सुनावणीदरम्यान सांगितले की, केजरीवाल यांना डिव्हाइसचा पासवर्ड विचारण्यात आला तेव्हा त्यांनी ते सांगण्यास नकार दिला आणि वकिलांना विचारल्यानंतर ते सांगू, असे सांगितले. त्याच्या रिमांडची मागणी करताना, ईडीतर्फे हजर असलेले वकील एसव्ही राजू म्हणाले की, केजरीवाल यांना आणखी काही लोकांच्या समोर यावे लागेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App