वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनानंतर केदारनाथ ( Kedarnath ) यात्रा दोन दिवसांसाठी थांबवण्यात आली आहे. राज्यात ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या 12 आणि एसडीआरएफच्या 60 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
केदारनाथमध्ये ढगफुटीनंतर लिंचोली आणि भिंबळी येथील पायी मार्गावर अडकलेल्या 2000 हून अधिक लोकांची सुटका करण्यात आली. त्यांना वाचवण्यासाठी चिनूक आणि एमआय-१७ हेलिकॉप्टरसह ७ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. मात्र, 300 यात्रेकरू अजूनही अडकून पडले आहेत. पावसामुळे हरिद्वार, डेहराडून, टिहरी, रुद्रप्रयाग आणि नैनितालमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशाच्या पूर्व, पश्चिम, मध्य आणि उत्तर-पूर्व भागात मान्सून जोरदार सक्रिय आहे. हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी (2 जुलै) 24 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने सांगितले की, देशातील बहुतांश भागात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा 106% जास्त पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, ईशान्य, पूर्व भारत, लडाख, सौराष्ट्र, कच्छ, मध्य भारताचा काही भाग आणि द्वीपकल्पीय भारतामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी मध्य प्रदेशात मजबूत यंत्रणा सक्रिय झाली असून, ती पुढील चार दिवस राहणार आहे. मध्य प्रदेशात हंगामातील 51% म्हणजेच 18.9 इंच पाऊस झाला आहे. उत्तर प्रदेशात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासांत 72 जिल्ह्यांत 22.8 मिमी पाऊस झाला आहे. हे सामान्यपेक्षा 175% जास्त आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App