वृत्तसंस्था
श्रीनगर : Kashmir गुरुवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्गच्या नागिन भागात नियंत्रण रेषेजवळ 18 राष्ट्रीय रायफल्सच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 2 जवान शहीद झाले असून 2 पोर्टरचा मृत्यू झाला आहे.Kashmir
सैन्याला मदत करण्यासाठी पोर्टर्स असतात, ते डोंगराळ भागात आणि पुढच्या चौक्यांमध्ये सामान पोहोचवण्यास मदत करतात. या हल्ल्यात लष्कराचे 7 जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमींना श्रीनगरमधील 92 बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्यापैकी 3 जवानांचा मृत्यू झाला.
लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 3 हून अधिक दहशतवादी सहभागी असू शकतात. त्याचवेळी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. उत्तर काश्मीरमधील बोटा पाथरी सेक्टरमध्ये एलओसीवरून दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असावी, असा अंदाज आहे.
पुलवामामध्ये सकाळी दहशतवादी हल्ला, मजूर जखमी आज सकाळी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील बटगुंडमध्ये दहशतवाद्यांनी आणखी एका मजुरावर गोळीबार केला होता, त्यात तो जखमी झाला होता. जखमी शुभम कुमार हा यूपीचा रहिवासी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
370 हटवल्यानंतर, TRF सक्रिय झाला, टार्गेट किलिंग केली
टीआरएफला भारतात दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, टीआरएफची निर्मिती पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्करने केली आहे. हे लष्कर आणि जैशच्या कॅडरला एकत्र करून तयार करण्यात आले आहे. काश्मिरी, काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या हत्येच्या अनेक घटनांमध्ये या संघटनेचा हात आहे. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर TRF अधिक सक्रिय झाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कराने नव्हे तर टीआरएफने घेतली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App