Congress काँग्रेसच्या यादीत राहुल गांधींनी घातले लक्ष, 100 पेक्षा कमी नाहीच, ठरवले लक्ष्य!!

Congress

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Congress महाविकास आघाडीतल्या जागा वाटपामध्ये महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसमोर कमी पडले, अशी नाराजी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केल्याच्या बातम्या पवारनिष्ठ मराठी माध्यमांनी पेरल्या. परंतु, प्रत्यक्षात राहुल गांधींनी काँग्रेसच्या यादीत पर्सनली लक्ष घातले आणि 100 पेक्षा कमी जागा स्वीकारायच्या नाहीत, अशा स्पष्ट सूचना दिल्या. असेच नंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यातून समोर आले. Congress

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांना 85 जागांच्या खोड्यात अडकवले. तसे पत्रकार परिषदेत जाहीर करायला लावले. त्यामुळे महाविकास आघाडीची माध्यमांमध्ये किरकिरी झाली. महायुतीच्या नेत्यांनी काँग्रेस नेत्यांना चिमटे काढले. पण या सगळ्याची दखल घेऊन महाराष्ट्रातले काँग्रेस नेते दिल्लीत जाऊन आक्रमक झाले .100 पेक्षा कमी जागा स्वीकारायच्या नाहीत हे त्यांनी काँग्रेस हायकमांडच्या गळी उतरवले. शरद पवारांनी टाकलेल्या 85 च्या खोड्यातून काँग्रेस नेत्यांनी पाय सोडवून घेतले. पण त्याचवेळी राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या पवारनिष्ठ मराठी माध्यमांनी पेरल्या. Congress

प्रत्यक्षात राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या यादीत पर्सनली लक्ष घातले. काँग्रेस पक्ष जातिगत जनगणना आणि ओबीसी मुद्द्यावर आक्रमक आहे. त्यामुळे ओबीसी जागांवर लक्ष केंद्रित करा. तिथे आपले उमेदवार कमी पडता कामा नयेत हे पाहा, अशा स्पष्ट सूचना राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिल्या. हा एक प्रकारे ट्रिपल डिजिट जागा लढवण्याचा संदेश असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे काँग्रेस पवारांच्या 85 च्या खोड्यात न अडकता 105 जागांपर्यंत उमेदवार उभे करेल असे स्पष्ट झाले. काँग्रेसच्या सेंट्रल इलेक्शन कमिटीच्या बैठकीनंतर ही उमेदवारी यादी आज सायंकाळपर्यंत जाहीर होईल, असे नाना पटोले यांनी सांगितले.

Congress second list of candidates will be announced today

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात