बेनिवाल यांनी खिनवसार मतदारसंघातून पत्नीला उमेदवारी दिली Congresss
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : . राजस्थानमधील सात विधानसभा जागांवर १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेससह सर्व पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. उमेदवारांच्या नावांची घोषणा होताच, गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष (आरएलपी) आणि भारत आदिवासी पक्ष (बीएपी) सोबतची काँग्रेसची युती संपुष्टात आली आहे. Congresss
काँग्रेसने सर्व सात जागांवर उमेदवार घोषित केले, तर आरएलपीचे अध्यक्ष आणि खासदार हनुमान बेनिवाल हे त्यांच्या पक्षासाठी युतीमध्ये खिंवसार जागेची मागणी करत होते. चौरासी आणि सलुंबर या दोन जागांसाठी बीएपीने आधीच उमेदवार जाहीर केले होते. बीएपीचे खासदार आणि संस्थापक राजकुमार रोत यांनी काँग्रेसला दोन्ही जागांवर उमेदवार जाहीर करू नयेत, असे सांगितले होते. मात्र काँग्रेसने आरएलपी आणि बीएपीसोबतची युती संपवत दोन्ही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह दोतासरा म्हणाले, आमची आघाडी दिल्लीत आहे. काँग्रेसने युती तोडल्याबद्दल नाराजी व्यक्त करत बेनिवाल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, माझा शत्रू क्रमांक एक भाजप आहे. पण काँग्रेसने विश्वासघात केला आहे. युती संपुष्टात आल्यानंतर बेनिवाल यांनी पत्नी कनिका यांना खिंवसार मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App