जाणून घ्या, कोणत्या उमेदवारांचा केला आहे समावेश?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा पक्ष नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतील 13 उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत.
मनसेच्या तिसऱ्या यादीत अमरावतीमधून पप्पू ऊर्फ मंगेश पाटील, नाशिक पश्चिममधून दिनकर धर्माजी पाटील, अहमदपूर-चाकूरमधून नरसिंग भिकाणे, परळीतून अभिजित देशमुख, विक्रमगडमधून सचिन रामू शिंगडा, भिवंडीतून वनिता शशिकांत कथुरे, भिवंडीतून पप्पू उर्फ मंगेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पालघरमधून नरेश कोरडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Bajrang Punia : बजरंग पुनिया यांना काँग्रेसमध्ये जबाबदारी:किसान सेलचे कार्यकारी प्रमुख करण्यात आले; विनेश फोगाट उपस्थित
तसेच मनसेने शहादामधून आत्माराम प्रधान, वडाळ्यातून स्नेहल सुधीर जाधव, कुर्ल्यातून प्रदीप वाघमारे, ओवळा-माजिवडामधून संदीप पाचंगे, गोंदियातून सुरेश चौधरी आणि पुसदमधून अश्विन जैस्वाल यांना उमेदवारी दिली आहे.
यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 45 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यापैकी 16 जागा मुंबईत आहेत. या यादीत पक्षाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
उद्धव गटानेही यादी जाहीर केली
शिवसेना (UBT) ने बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्यामध्ये माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना मध्य मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या बहुतेक आमदारांना शिवसेना UBT ने पुन्हा उमेदवारी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App