केरळमधील वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. Priyanka Gandhi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी बुधवारी (२३ ऑक्टोबर) केरळमधील वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. नामांकनादरम्यान त्यांनी आपली संपत्तीही जाहीर केली. ज्यात त्यांनी सांगितले की त्याच्याकडे 8 लाख रुपयांची कार आणि 1.15 कोटी रुपयांचे सोने आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वायनाडमधून त्यांच्या पहिल्या निवडणूक लढतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी, प्रियंका गांधी यांनी वायनाडमधील कलपेट्टा येथे सकाळी 11:45 वाजता एका विशाल रोड शोमध्ये भाग घेतला.
Bajrang Punia : बजरंग पुनिया यांना काँग्रेसमध्ये जबाबदारी:किसान सेलचे कार्यकारी प्रमुख करण्यात आले; विनेश फोगाट उपस्थित
प्रियांका गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात 4 कोटी 24 लाख रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. त्यांच्याकडे 52 हजार रुपये रोख, 2 कोटी 24 लाख रुपयांचे म्युच्युअल फंड, बँक खात्यात सुमारे 3 लाख 60 हजार रुपये, पीपीएफ खात्यात 17 लाख 38 हजार रुपये, 8 लाख रुपयांची होंडा सीआरव्ही कार आहे. पतीने ती भेट दिली आहे. याशिवाय त्यांच्याकडे 1 कोटी 15 लाख रुपयांचे सोने आणि 29 लाख रुपयांची चांदी आहे.
याशिवाय प्रियंका गांधी यांच्याकडे 2 कोटी 10 लाख 13 हजार 598 रुपयांची शेतजमीन आहे, जी दिल्लीजवळील सुलतानपूर मेहरोली गावात आहे आणि त्यात त्यांचे बंधू राहुल गांधी यांचाही वाटा आहे. प्रियांका गांधी यांचे हिमाचल प्रदेशातील शिमला येथे 5 कोटी 63 लाख 99 हजार रुपयांचे घर आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App