विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj thackeray महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातल्या बंडखोरांवर विसंबून राहिलेल्या परिवर्तन महाशक्तीला एकला चलो रे म्हणणारी राज ठाकरेंची मनसे देखील भारी ठरली आहे. कारण परिवर्तन महाशक्तीने 13 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यापेक्षा सहापट उमेदवार जाहीर करून मनसेने त्यांच्यावर मात केली. मनसेने आत्तापर्यंत 4 याद्या जाहीर करून तब्बल 70 जणांची उमेदवारी निश्चित केली आहे.
परिवर्तन महाशक्ती मध्ये भाजपकडून सुरुवातीला लाभार्थी ठरलेले माजी खासदार राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे माजी नेते वामनराव चटप, शंकर धोंडगे पाटील असे बडे नेते आहेत. त्यातही संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्ष स्थापन करून स्वतःला चिन्ह देखील मिळवले आहे. या सगळ्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन आपण तिसरी आघाडी नाही, तर परिवर्तन महाशक्ती आहोत, असे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्ष उमेदवारी यादी जाहीर करण्यात परिवर्तन महाशक्ती खूपच पिछाडीवर पडल्याचे दिसून आले.
महायुती आणि महाविकास आघाडी यांनी उमेदवारी नाकारलेले उमेदवार आमच्याकडे येतील. त्यांना आम्ही उमेदवारी देऊ, असे बच्चू कडू जाहीरपणे म्हणाले होते. त्यामुळे दोन्ही आघाड्यांच्या बंडखोरांवर परिवर्तन महाशक्ती विसंबून राहिल्याचे स्पष्ट झाले. महायुती आणि महाविकास आघाडी यांचेच अजून ठरेना. त्यामुळे बंडखोरांचेही पुढे काही चालेना आणि म्हणून परिवर्तन महाशक्तीला उमेदवार मिळेना, अशी अवस्था आली. या सगळ्यात एकट्या लढणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेने देखील उमेदवार जाहीर करण्यात त्यांच्यावर मात केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App