Jaya Bacchan Vs Jagdeep Dhankhar : जया बच्चन म्हणाल्या-तुमचा टोन चुकीचा; धनखड यांचे प्रत्युत्तर- सहन करणार नाही, तुम्ही सेलेब्रिटी असा वा कुणीही, डेकोरम पाळावा लागेल!!

Jaya Bacchan Vs Jagdeep Dhankhar

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेत राज्यसभेच्या कामकाजादरम्यान सपा खासदार जया बच्चन ( Jaya Bacchan  ) यांनी सभापती जगदीप धनखड ( Jagdeep Dhankhar ) यांच्या टोनवर आक्षेप घेतला. धनखड यांनी सपा खासदारांना जया अमिताभ बच्चन असे संबोधले होते.

यावर जया म्हणाल्या- मी एक कलाकार आहे. मला देहबोली समजते. मला अभिव्यक्ती समजते. मला माफ करा, पण तुमच्या बोलण्याचा टोन मान्य नाही. जया यांच्या या वक्तव्यावर धनखड संतापले.

सभापती जगदीप धनखड म्हणाले- तुम्ही तुमच्या सीटवर बसा. तुम्हाला माहित आहे की अभिनेत्याला दिग्दर्शक नियंत्रित करतो. मी दररोज आपल्या गोष्टीची पुनरावृत्ती करू इच्छित नाही. मला रोज शाळेत धडे देण्याचे काम करायचे नाही.



धनखड पुढे म्हणाले की, तुम्ही माझ्या टोनवर प्रश्नचिन्ह लावत आहात. हे सहन करणार नाही. सेलिब्रिटी असो किंवा इतर कोणीही असो, तुम्हाला डेकोरम पाळावा लागेल. ज्येष्ठ सदस्य खुर्चीचा अपमान करत आहेत.

यानंतर धनखड यांनी राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले. दुसरीकडे लोकसभेचे कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे.

जया म्हणाल्या- मला माफी हवी

जया आणि धनखड यांच्या वादात राज्यसभेत गदारोळ झाला. गुंडगिरी चालणार नाही, अशा घोषणा देत विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला. त्यानंतर लंच ब्रेक झाला.

जया बच्चन बाहेर आल्या आणि मीडियाला म्हणाल्या- विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी (अध्यक्षांनी) माईक बंद केला. ते प्रत्येक वेळी असंसदीय शब्द वापरतात. ते म्हणाले की, तुम्ही सेलिब्रिटी आहात याची मला पर्वा नाही. मी त्यांना पर्वा करायला सांगत नाही. मला माफी हवी आहे.

या अधिवेशनात यापूर्वी दोनवेळा जयांच्या नावावरून वाद झाला

सभागृहात स्वत:ला ‘जया अमिताभ बच्चन’ असे संबोधल्याने जया बच्चन संतापल्या आहेत. 22 जुलैपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावरून जया आणि सभापतींमध्ये यापूर्वी दोनदा वाद झाले आहेत. जया बच्चन म्हणतात की, महिलांची स्वतःची ओळख असते. त्यांना पतीच्या नावाने संबोधण्याची गरज नाही.

Jaya Bacchan Vs Jagdeep Dhankhar Rajya Sabha Session Updates

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात