पत्रकार परिषद घेऊन मायावतींचा थेट हल्लाबोल
विशेष प्रतिनिधी
लखनौ : हरियाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजपच्या विजयानंतर हिंदूंची एकजूट विरुद्ध जातीय मानसिकता यावर बरेच मंथन सुरू आहे. काँग्रेसने हिंदू मतांमध्ये फूट पाडण्यासाठी जातीवादी कार्ड खेळायचा प्रयत्न केला, पण तो फसला, असे विश्लेषण अनेकांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी थेट जाट समाजाचे नाव घेऊनच जोरदार हल्लाबोल केला आहे. Jat community in Haryana did not vote for BSP
बहुजन समाज पार्टीने उत्तर प्रदेशातल्या जाट समाजाचे जातीय मानसिकतेतून काही प्रमाणात परिवर्तन घडवून आणले पण हरियाणातील जाट समाजाने दलित उमेदवारांना मते दिली नाहीत. त्याचा परिणाम म्हणून इंडियन नॅशनल लोक दल आणि बहुजन समाज पार्टी यांच्या युतीला पराभवाचा सामना करावा लागला, अशा परखड शब्दांमध्ये मायावतींनी हरियाणा निवडणुकीचे विश्लेषण केले.
2. जबकि यूपी के जाट समाज के लोगों ने अपनी जातिवादी मानसिकता को काफी हद तक बदला है और वे बीएसपी से एमएलए तथा सरकार में मंत्री भी बने हैं। हरियाणा प्रदेश के जाट समाज के लोगों को भी उनके पदचिन्हों पर चलकर अपनी जातिवादी मानसिकता को जरूर बदलना चाहिए, यह खास सलाह। 2/3 — Mayawati (@Mayawati) October 8, 2024
2. जबकि यूपी के जाट समाज के लोगों ने अपनी जातिवादी मानसिकता को काफी हद तक बदला है और वे बीएसपी से एमएलए तथा सरकार में मंत्री भी बने हैं। हरियाणा प्रदेश के जाट समाज के लोगों को भी उनके पदचिन्हों पर चलकर अपनी जातिवादी मानसिकता को जरूर बदलना चाहिए, यह खास सलाह। 2/3
— Mayawati (@Mayawati) October 8, 2024
1. हरियाणा विधानसभा आमचुनाव बीएसपी व इनेलो ने गठबंधन करके लड़ा किन्तु आज आए परिणाम से स्पष्ट है कि जाट समाज के जातिवादी लोगों ने बीएसपी को वोट नहीं दिया जिससे बीएसपी के उम्मीदवार कुछ सीटों पर थोड़े वोटों के अन्तर से हार गए, हालांकि बीएसपी का पूरा वोट ट्रांस्फर हुआ। 1/3 — Mayawati (@Mayawati) October 8, 2024
1. हरियाणा विधानसभा आमचुनाव बीएसपी व इनेलो ने गठबंधन करके लड़ा किन्तु आज आए परिणाम से स्पष्ट है कि जाट समाज के जातिवादी लोगों ने बीएसपी को वोट नहीं दिया जिससे बीएसपी के उम्मीदवार कुछ सीटों पर थोड़े वोटों के अन्तर से हार गए, हालांकि बीएसपी का पूरा वोट ट्रांस्फर हुआ। 1/3
मायावती म्हणाल्या :
BSP-INLD युतीला काही जागा वगळता या जाट समाजाची मते मिळाली नाहीत. जातीयवादी मानसिकतेमुळे जाट समाजाने BSP ला मत दिले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी आमचे दलित उमेदवार पडले. चौटाला घराण्यातील भांडणामुळे BSP चे दलित मत पूर्णपणे भाजपला गेले. या भांडणामुळे हरियाणाच्या निवडणुका जाट आणि गैर-जाट समुदायांमध्ये विभागल्या गेल्या.
वास्तविक हरियाणा हे एक कृषीप्रधान राज्य आहे. शेतीशी संबंधित लोक, विशेषत: जाट भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे खूश नव्हता. त्यामुळेच जाट समाजाची बहुसंख्य मते काँग्रेसला गेली. पण हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या काही जागा सोडल्या तर जाट समाजाने BSP उमेदवारांना मतदान केले नाही, बसपचे दलित मत संपूर्णपणे INLD उमेदवारांना मिळाले. पण त्यांच्याशी जोडलेला जाट समुदाय भाजप मते देऊन गेला. या भांडणात भाजपा पुन्हा एकदा सत्तेवर आली. बसपचे खूप नुकसान झाले.
उत्तर प्रदेशातल्या मधील जाट समाजाची जातीयवादी मानसिकता बसपामुळे खूप बदलली आहे, पण हरियाणात ती बदललेली नाही. हरियाणातला जाट समुदाय दलितांबद्दलची त्यांची मानसिकता पूर्णपणे बदलू शकला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App