वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दंगलग्रस्त जहांगीरपुरी भागात आज सकाळी 10.00 वाजल्यापासून सुमारे दीड तास 9 बुलडोझर चालले. डझनभर अतिक्रमित दुकाने पाडली. पण सुप्रीम कोर्टाने बुलडोजर कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे. जहांगिरपुरीतील स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे बुलडोझर प्रत्यक्ष कारवाईच्या जागी स्थगित झाले आहे. Jahangirpuri: 9 bulldozers run for an hour and a half, knocking down dozens of overcrowded shops; Immediate adjournment of Supreme Court !!
आज सकाळी 10.00 वाजता प्रचंड बंदोबस्तात आणि पोलिसी फौजफाट्यासह उत्तर दिल्ली महापालिकेने जहांगीरपूरी विभागातील अतिक्रमणांवर बुलडोझर चालवले. या संदर्भातल्या नोटिसा आधीच संबंधित लोकांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे जहांगीरपुरी भागात प्रचंड जमाव जमला असला तरी कायदेशीर कारवाई करत बुलडोजर आपले काम पार पाडत होते. अतिक्रमित दुकानांवर बुलडोझर चालले. सुमारे एक डझन दुकानांवर बुलडोजर कारवाई करण्यात आली. परंतु,बुलडोजर तर चालू असतानाच दीड तासातच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आणि कारवाई तात्पुरती स्थगित करावी लागली.
यासंदर्भात उत्तर दिल्लीचे महापौर इक्बाल सिंग यांनी निवेदन जारी केले आहे. दिल्ली महापालिका कोणतेही बेकायदेशीर कृत्य करणार नाही आणि अतिक्रमण देखील सहन करणार नाही. सुप्रीम कोर्टाचे आदेश आल्यामुळे बुलडोजर कारवाई सध्या थांबवली आहे कोणत्याही धर्माला टार्गेट करून बुलडोजर कारवाई करण्यात येत नाही. फक्त अतिक्रमणे तोडण्यात येत आहेत. परंतु आता सुप्रीम कोर्टाने आदेश काढल्यामुळे त्या आदेशानुसारच बुलडोजर कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली आहे, असे इक्बाल सिंग यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
जहांगीरपुरीत रामनवमी हनुमान जयंतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर दगडफेक करून समाजकंटकांनी दंगल केली होती. या दंगलीचा मुख्य आरोपी मोहम्मद अन्सार याने पुष्पा स्टाईल मस्ती दाखवा कोर्टात जाताना आपली हेकडी अजून गेली नसल्याचे दाखवून दिले होते. पोलिसांनी नंतर त्याची हेकडी काढली. पोलिसांनी त्याच्यासह 24 आरोपींना अटक करून पोलिस कोठडीत ठेवले आहे. आज त्यांच्या पुढच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी आहे.
परंतु, दरम्यानच्या काळात उत्तर दिल्ली महापालिकेने अतिक्रमणविरोधी ड्राईव्ह सुरू केला. सुमारे दीड तास 9 बुलडोजर चालवल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे आदेश आले. त्यामुळे बुलडोजर कारवाई स्थगित करावी लागली आहे. पण या कारवाईत दीड तासांमध्ये 9 बुलडोझर चालवून सुमारे डझनभर अतिक्रमित दुकाने उध्वस्त करण्यात आली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App