लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या ‘दरबार’मध्ये जगन रेड्डी आणि चंद्राबाबू नायडू

भाजप आणि YSRCP किंवा TDP यांच्यात अनौपचारिक युती आहे.

विशेष प्रतिनिधी

हैदराबाद : काही आठवड्यांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्याबरोबरच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आंध्र प्रदेशात आपला ‘पार्टनर’ निवडण्यात व्यस्त असल्याचे दिसते. तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर 24 तासांपेक्षा कमी कालावधीनंतर मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही दिल्ली गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. Jagan Reddy and Chandrababu Naidu at BJPs Darbar before Lok Sabha Elections

रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांचा पक्ष YSR काँग्रेस आणि TDP च्या आंध्र प्रदेशला विशेष दर्जा, केंद्रीय निधी आणि इतर मुद्द्यांवर दीर्घकालीन मागणी केली आहे. मात्र, भाजप आपल्या परंपरेनुसार ‘Wait and Watch मोडमध्ये असल्याचे या बैठकीतून सूचित होत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. निवडणुकीपूर्वी कोणत्याही पक्षाशी वचनबद्ध होण्यापूर्वी भाजप पर्यायांचा विचार करत आहे.

भाजप आणि YSRCP किंवा TDP यांच्यात अनौपचारिक युती आहे. प्रादेशिक पक्षांना औपचारिक युती करून अल्पसंख्याकांची मते गमावण्याचा धोका आहे. भाजपाची राज्यात राजकीय ताकद नाही, पण असे असतानाही भाजपला जे हवे ते होईल. असे दिसते

Jagan Reddy and Chandrababu Naidu at BJPs Darbar before Lok Sabha Elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात