गेल्या वर्षी 23 ऑगस्टला भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिणेकडील प्रदेशात उतरले होते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISROने भारताच्या चांद्रयान-3 ( Chandrayaan 3 ) मोहिमेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त जगाला एक मोठी भेट दिली आहे. इस्रोने संशोधकांच्या संशोधनासाठी चांद्रयान-३ मिशनशी संबंधित वैज्ञानिक डेटा सार्वजनिक केला आहे. गेल्या वर्षी 23 ऑगस्टला भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिणेकडील प्रदेशात उतरले होते. असे करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.
प्राप्त माहितीनुसार, इस्रोने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरवरील पाच पेलोड्समधून मिळवलेला 55 गीगाबाइट्स (GB) डेटा जगभरातील संशोधकांसाठी सार्वजनिक केला आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितले की, हा डेटा केवळ ती उपकरणे बनवणाऱ्या शास्त्रज्ञांपुरता मर्यादित नसून, देशातील आणि जगातील सर्व संशोधकांना विश्लेषणासाठी उपलब्ध करून दिला जाईल.
चांद्रयान-3 डेटा संच भारतीय अंतराळ विज्ञान डेटा केंद्र (ISSDC) च्या पॉलिसी-आधारित डेटा पुनर्प्राप्ती, विश्लेषण, प्रसार आणि अधिसूचना प्रणाली (PRADAN) पोर्टलवर उपलब्ध आहेत. प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागाचे स्थलीय रासायनिक विश्लेषण केले, ज्यामुळे चंद्राची उत्पत्ती आणि उत्क्रांती अधिक चांगल्या प्रकारे समजू शकली. ही माहिती भविष्यातील शोध आणि चंद्रावरील संभाव्य संसाधनांच्या वापरासाठी महत्त्वाची आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App