12 मिनिटांत हॉस्पिटल तयार, जाणून घ्या, भीष्म क्यूब म्हणजे काय?
विशेष प्रतिनिधी
कीव : 1991 मध्ये युक्रेनला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या पंतप्रधानांनी देशाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि युक्रेनने अलीकडेच रशियाच्या हद्दीत आक्रमक लष्करी कारवाया केल्याच्या वेळी ही भेट झाली आहे. पोलंडहून सुमारे 10 तासांच्या ट्रेन प्रवासानंतर कीव येथे पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी ( Narendra Modi ) शुक्रवारी कीवमध्ये राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी विस्तृत चर्चा केली आणि युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली.
युद्धग्रस्त युक्रेनच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांततेचा संदेश घेऊन आल्याचे स्पष्ट केले. मोदींनी कीवमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना जी भेट दिली ते पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. भारताने युक्रेनला भीष्म क्यूब ही वैद्यकीय मदत दिली. भीष्म क्यूब म्हणजे एक प्रकारे फिरते रुग्णालय.
हा भीष्म काय आहे हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे? पीएम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला भीष्म प्रकल्प आरोग्य मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे. त्याला भीष्म असे नाव पडले कारण त्याचे पूर्ण ‘Battlefield Health Information System for Medical Services’.आहे.
नैसर्गिक आपत्ती, मानवतावादी संकटे किंवा शांतता आणि युद्धाच्या काळात केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही सुरळीत आणि जलद तैनाती हा या सेवेचा विकास करण्यामागचा उद्देश आहे. भीष्म क्यूबंना सहज कुठेही नेले जाऊ शकते. शिवाय, त्यात इतकी आधुनिक वैद्यकीय उपकरणे आहेत की, तिथे लगेच उपचार सुरू करता येतात. या रुग्णालयाचे वैशिष्टय़ म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत जहाजातून हवेत सोडले जाऊ शकतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App