सौदी अरब सरकारच्या नकाशातून इस्रायल गायब; पॅलेस्टाईनलाच जागा; अमेरिकेचे सूचक मौन


वृत्तसंस्था

रियाध : सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये राजनैतिक संबंध सुरू करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट होत आहे. सौदी सरकारने नुकताच नवा नकाशा जाहीर केला आहे. एक देश म्हणून इस्रायलचे अस्तित्व यात दिसत नाही. नकाशात इस्रायल हा पॅलेस्टाईनचा भाग म्हणूनही दाखवला आहे. ‘द जेरुसलेम पोस्ट’ या इस्रायली वृत्तपत्रानेही याला दुजोरा दिला आहे. srael disappears from the map of the Saudi Arabian government; Palestine itself; America’s indicative silence

सौदी सरकारच्या या पावलावर सध्या इस्रायल आणि अमेरिकेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतल्यानंतरच दोन्ही देश कोणतीही प्रतिक्रिया देतील, असे मानले जात आहे.

सरकारने नकाशा जाहीर केला

सौदी सरकारच्या सर्वेक्षण आणि भूराजकीय विभागाच्या जनरल अथॉरिटीने हा नवा नकाशा जारी केला आहे. नंतर सरकार नियंत्रित माध्यमांनी ते प्रसिद्ध केले. नव्या नकाशात कुठेही इस्रायलचा मागमूस नाही. या नकाशात संपूर्ण इस्रायल पॅलेस्टाईनचा भाग दाखवण्यात आला आहे.

सौदी सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले- आम्ही फक्त ती माहिती दिली आहे जी आमच्या देशाची आणि सरकारची भूमिका आहे. यातूनच आम्ही आमची रणनीती आणि नियोजन अमलात आणू. सध्या या संदर्भात अधिक माहिती देता येणार नाही. वेळ आल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.



आता तर संवादही थांबला आहे

सौदी अरेबिया आणि इस्रायलमधील राजनैतिक संबंध सुरू करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. ‘टाइम्स ऑफ इस्रायल’ने रविवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यातील मागच्या दरवाजाची चर्चा स्थगित करण्यात आल्याचे म्हटले आहे.

इस्रायलचे कट्टरतावादी सरकार आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करण्यास तयार नाहीत, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. यामुळेच सौदी अरेबियाने अमेरिकेला सांगितले आहे की, सध्या चर्चा सुरू ठेवून काही फायदा नाही. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) इस्रायलच्या या वृत्तीवर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.
इस्रायली वृत्तपत्राच्या अहवालात सौदी अरेबियातील अलफ या वृत्तपत्रातील लेखाचाही हवाला देण्यात आला आहे.

त्यानुसार अमेरिकेने नेतन्याहू सरकारला सौदी सरकारच्या नाराजीची माहिती दिली आहे. नेतन्याहू सरकारमधील मंत्री बेझालेल स्मोट्रिच आणि इटामन बेन गिवीर यांची अलीकडील विधाने चर्चा पुढे ढकलण्यासाठी आधार बनली आहेत.

या दोन्ही मंत्र्यांनी नुकतीच इस्रायलच्या ताब्यातील भागाला भेट दिली होती आणि नेतन्याहू सरकार कोणत्याही किंमतीत पॅलेस्टाईनला कोणताही दिलासा देणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते.

खुद्द नेतान्याहू यांनीही मागच्या महिन्यात म्हटले होते – आम्हाला खुल्या मनाने बोलायचे आहे, पण इस्रायलच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही. माझ्याकडे युतीचे सरकार आहे, त्यामुळे मित्रपक्षांचे म्हणणे ऐकणे महत्त्वाचे आहे. दोन्ही बाजूंनी इच्छा असल्यास इस्रायल आणि सौदी अरेबियामधील संबंध सामान्य होऊ शकतात.

israel disappears from the map of the Saudi Arabian government; Palestine itself; America’s indicative silence

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात