इस्लामिक स्टेट भारतात हातपाय पसरण्याचा करतेय प्रयत्न, आत्तापर्यंत १६८ जणांना एनआयएकडून अटक

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट ही कट्टर मुस्लिम संस्था भारतामध्ये हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) १६८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर दहशतवादी हल्ले, षड्यंत्र आणि दहशतवादाच्या फंडिंगचे गुन्हे आहेत.Islamic State spreading in India, NIA arrests 168 so far

इस्लामिक स्टेटसच्या विचारधारेने हे प्रेरित झालेले होते. यामध्ये ३१ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. त्यातील सर्वात ताजे प्रकरण जूनमध्ये नोंदवण्यात आले होते आणि 27 आरोपींना चाचणीनंतर दोषी ठरवण्यात आले आहे.



एनआयएने केलेल्या तपासात समोर आले आहे की, आयएस (इस्लामिक स्टेट) ऑनलाइनद्वारे सतत प्रचार करून भारतात आपले हातापाय पसरण्याचा प्रयत्न करत आहे. फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम सारख्या खुल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भोळ्या- भाबड्या तरुणांना लक्ष्य केले जात आहे.

इस्लामिक स्टेटचे अतिरेकी भारतातील भोळ्याभाबड्या तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी विविध कार्यक्रम राबवित आहे. त्यासाठी दहशतदवाच्या संदर्भातील माहिती ऑनलाईन सामग्री अपलोड केली जात आहे. त्यासाठी स्थानिक भाषांचाही आधार घेतला जात आहे. त्याचबरोबर दहशतवादाचे मॉड्युल तयार कले जात आहे. त्यांच्यासाठी शस्त्रे आणि दारुगोळा गोळा करण्यात येत आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने तमिळनाडूत अनेक ठिकाणी धाडी टाकून काही जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे भारतात इस्लामिक स्टेटचे (इसिस) जाळे पसरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. केरळ आणि तमिळनाडू येथे मुसलमान तरुणांची इस्लामिक स्टेटमध्ये भरती करण्याचे काम जोरात सुरू आहे.

इसिस ही मुख्यत: सीरिया आणि इराकमधील आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना. तिथे अनेक देशांच्या मिळून तिचा पाडाव केल्यामुळे इसिसचे सैनिक विखुरले गेले आहेत
तमिळनाडू आणि शेजारच्या केरळमध्ये इस्लामी कट्टरवाद वाढत असून त्यामुळे इसिसची पावले पसरत आहेत.

या संदर्भात लोकसभेतही 20 डिसेंबर 2017 रोजी केरळच्या खासदार विजिता सत्यानंद यांनी प्रश्न विचारला होता. केरळचे 100 जण इसिसमध्ये गेले आहेत का आणि गेले असल्यास सरकारने या संदर्भात कोणती पावले उचलली, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. इंटरनेटच्या माध्यमातून इसिसविषयी माहिती घेण्याचे सर्वाधिक प्रमाण केरळमध्ये आहे. यानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या दाक्षिणात्य राज्यांचा क्रमांत लागतो.

Islamic State spreading in India, NIA arrests 168 so far

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात