रूग्णालयात दाखल झाल्यानंतर केली होती पोस्ट, जाणून घ्या काय म्हणाले आहेत..
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ratan Tata भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा ( Ratan Tata ) हे त्या नावांपैकी एक होते जे देशातील प्रत्येक व्यक्तीला आवडले होते आणि भविष्यातही ते आवडत राहतील. काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांना उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण काल, म्हणजेच ९ ऑक्टोबरच्या रात्री अशी एक बातमी समोर आली ज्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त काल रात्री उशीरा समोर आले.Ratan Tata
रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. आता त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जी त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर लिहिली आहे. त्यांनी त्यांच्या शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हटले होते आणि त्यावर युजर्सच्या काय प्रतिक्रिया आहेत, हे पाहूयात.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर रतन टाटा यांच्या प्रकृतीची सर्वत्र चर्चा सुरू झाली. त्यांच्या प्रकृतीसाठी त्याचे प्रियजन प्रार्थना करू लागले. दरम्यान, त्यांनी एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘माझ्या आरोग्याविषयी अलीकडेच पसरलेल्या अफवांची मला जाणीव आहे आणि हे दावे निराधार असल्याची सर्वांना खात्री देऊ इच्छितो. माझे वय आणि काही वैद्यकीय परिस्थितींमुळे मी सध्या वैद्यकीय तपासणी करत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मी पूर्णपणे ठीक आहे आणि जनतेला आणि माध्यमांना विनंती करतो की चुकीची माहिती पसरवू नये.
ही पोस्ट वाचल्यानंतर त्यांचे चाहते आणि इंटरनेट यूजर्स भावूक झाले आणि त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले – तुम्ही खोटे बोललात, का? आणखी एका युजरने लिहिले – भारताने एक अनमोल रत्न गमावले आहे. तिसऱ्या यूजरने लिहिले- कृपया कोणीतरी सांगा की ही बातमी खोटी आहे. चौथ्या यूजरने लिहिले – तुमच्या आत्म्याला शांती लाभो. आणखी एका यूजरने लिहिले – या देशाने एक महापुरुष गमावला आहे. तर एका यूजरने लिहिले – आज आपण खरा कोहिनूर गमावला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App