Inspiring : लहान बहिणीला कडेवर घेऊन शाळा शिकणाऱ्या 10 वर्षीय मुलीने जिंकली सर्वांची मने, मंत्र्यांनीही केले कौतुक


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 10 वर्षांची मणिपूरमधील मुलगी तिच्या लहान बहिणीला हातात घेऊन शाळेत जात असल्याच्या फोटोने नेटिझन्स आणि मणिपूरचे ऊर्जा, वन आणि पर्यावरण मंत्री विश्वजित सिंग यांची मने जिंकली आहेत. मिनिंगसिनलिउ पामेई, इयत्ता चौथीत शिकणारी 10 वर्षांची विद्यार्थिनी, तिचे आईवडील शेतीत राबत असल्याने तिच्या लहान बहिणीची काळजी घेण्यासाठी ती तिलाही शाळेत घेऊन गेली. या फोटोने विश्वजित सिंग यांचे लक्ष वेधून घेतले.Inspiring A 10-year-old schoolgirl with her little sister on her side wins everyone heart, Ministers also appreciated

त्यांनी लिहिले, शिक्षणाप्रति तिच्या समर्पणाने मला चकित केले. मणिपूरमधील तामेंगलाँग येथील 10 वर्षीय पामेई आपल्या बहिणीची काळजी घेत शाळा शिकते आहे. ती तिच्या लहान बहिणीला कडेवर घेऊन अभ्यास करते.



मंत्री म्हणाले की, त्यांनी चिमुरडीच्या कुटुंबाशी संपर्क साधला आहे आणि त्यांना मिनिंग्सिन्लियूला इंफाळला आणण्यास सांगितले आहे. मीनिंग्सिन्लियूच्या शिक्षणाची जबाबदारी ती पदवीधर होईपर्यंत सांभाळणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. सिंग यांनी ट्विट केले की, “सोशल मीडियावर ही बातमी पाहताच आम्ही त्यांच्या कुटुंबाचा शोध घेतला आणि त्यांना इंफाळला आणण्यास सांगितले. ती पदवीधर होईपर्यंत मी स्वतः तिच्या शिक्षणाची काळजी घेईन, असे तिच्या कुटुंबीयांशी बोलले. तिच्या समर्पणाचा अभिमान वाटतो.”

विश्वजित सिंग यांच्या ट्विटला रिट्विट करताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लिहिले की, “ही शक्तिशाली प्रतिमा आमच्या मुलांच्या, विशेषतः मुलींच्या आकांक्षा दर्शवते. मीनिंगसिनलिउ पाल्मेई हिच्या शिक्षणाप्रति असलेले समर्पण आणि स्वत:साठी चांगले जीवन निर्माण करण्याचा तिचा निर्धार यामुळे तरुण प्रभावित झाले आहेत. तिला माझे अनेक आशीर्वाद.”

वृत्तानुसार, मीनिंग्सिनलिउचे कुटुंब उत्तर मणिपूरच्या तामेंगलाँग जिल्ह्यात राहते. मणिपूरच्या तामेंगलाँग जिल्ह्यातील डेलॉन्ग प्राथमिक शाळेत ही १० वर्षांची मुलगी शिकत आहे. फोटोने नेटिझन्सच्या हृदयावर छाप सोडली, ज्यांनी लहान मुलीचे तिच्या शिक्षणासाठी आणि तिच्या बहिणीच्या घेतलेल्या काळजीबद्दल कौतुक केले आहे.

Inspiring A 10-year-old schoolgirl with her little sister on her side wins everyone heart, Ministers also appreciated

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात