Indian scientists Invent transparent masks made from polymers, appreciated by union Health Minister

भारतीय शास्त्रज्ञांची कमाल, पॉलीमरपासून बनवले पारदर्शक मास्क, आरोग्यमंत्र्यांनीही केले कौतुक

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मास्क अत्यंत प्रभावी शस्त्र असल्याचे सिद्ध झाले आहे. (Indian scientists Invent transparent masks made from polymers) परंतु अनेकांना मास्क लावण्याचा त्रास वाटतो. मास्क लावून श्वास घेण्यास त्रास झाल्याच्याही काही सामान्य तक्रारी आहेत. याशिवाय चष्मा असणाऱ्या व्यक्तींनाही याचा विशेष त्रास होतो. मास्क लावून केलेल्या श्वासोच्छवासामुळे चष्म्याच्या काचा धुरकट होतात. परंतु आता अशाच समस्यांवर चंदिगडच्या शास्त्रज्ञांनी उपाय शोधला आहे.


विशेष प्रतिनिधी

चंदिगड : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मास्क अत्यंत प्रभावी शस्त्र असल्याचे सिद्ध झाले आहे. (Indian scientists Invent transparent masks made from polymers) परंतु अनेकांना मास्क लावण्याचा त्रास वाटतो. मास्क लावून श्वास घेण्यास त्रास झाल्याच्याही काही सामान्य तक्रारी आहेत. याशिवाय चष्मा असणाऱ्या व्यक्तींनाही याचा विशेष त्रास होतो. मास्क लावून केलेल्या श्वासोच्छवासामुळे चष्म्याच्या काचा धुरकट होतात. परंतु आता अशाच समस्यांवर चंदिगडच्या शास्त्रज्ञांनी उपाय शोधला आहे.

पॉलीमरपासून पारदर्शक मास्कची निर्मिती

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही हा मास्क परिधान करून त्याचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे हा मास्क पूर्णपणे पारदर्शक आहे. हा सहज घालण्यायोग्य मास्क चंदिगडच्या सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रूमेंट ऑर्गनायझेनशनने बनवला आहे.

चंदीगडच्या दौऱ्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी या संस्थेला भेट दिली. येथे त्यांनी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर इंटेलिजन्स सेन्सॉर लॅबोरेटरीचा शुभारंभ केला. यादरम्यान ते म्हणाले की, या प्रयोगशाळांद्वारे आपले आयुष्य सुकर होईल. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी या प्रयोगशाळांमध्ये विशेष साधने तयार केली जात आहेत.

मास्कची वैशिष्ट्ये

चंदीगडच्या सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रूमेंट ऑर्गनायझेशन (सीएसआयओ) ने हा मास्क तयार केला आहे. सीएसआयओच्या शास्त्रज्ञ डॉ. सुनीता मेहरा यांनी पॉलिमरपासून या मास्कची निर्मिती केली आहे. कोरोनाचा विषाणू त्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनाही मास्क भेट देण्यात आला.

या मास्कचे वैशिष्ट्य असे आहे की, तो सर्व बाजूंनी बंद आहे, परंतु तो लावल्यानंतर श्वास घेण्यास कोणतीही अडचण येत नाही. त्याच वेळी श्वास बाहेर टाकल्यानंतरही वाफ जमा होत नाही. त्यावर ड्रॉपलेट वगैरे पडल्यास ते सहज धुतले जाऊ शकते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मास्क पारदर्शक आहे. याद्वारे लोकांचा संपूर्ण चेहरा दिसू शकतो. हा मास्क विमानतळासारख्या इतर ठिकाणीही खूप प्रभावी सिद्ध होईल. सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादींद्वारे मास्क घातलेल्या व्यक्तीही स्पष्ट दिसतील. या मास्कचे पेटंट दाखल करण्यात आले आहे.

सध्या या मास्कची किंमत दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत आहे. बाजारात आल्यास तो आणखी स्वस्त होईल. याशिवाय एक खास चष्मादेखील तयार करण्यात आला आहे. तो वापरल्याने डोळे पूर्णपणे सुरक्षित राहतील. त्यातही अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्याची किंमत जवळपास 250 रुपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*