विशेष प्रतिनिधी
मोहाली : तुमच्यासोबत असं कधी झालंय का? तुम्हाला कोणासोबत बोलायची सक्त गरज असते. पण बोलायला कोणीही नसतं. आपण मोबाइल हातात घेतो, कॉन्टॅक्ट लिस्ट वरून खाली स्क्रोल करतो, फेसबुकवर जातो, मेसेंजर वर जातो, इंस्टावर जातो. पण बोलायला कुणीही नसतं.
Inspired by the movie 3 Idiots, a 21-year-old psychology student started a unique cafe in Mohali
हे एकटेपण, लोन्लीनेस, दु:ख नैराश्य यामुळे बऱ्याचवेळा मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. मानसिक आरोग्यावर बरेच लोक अजूनही मोकळेपणाने अजिबात बोलत नाहीत. डिअर जिंदगीमध्ये शाहरुख खानचा एक डायलॉग होता, लोक मनाला आपल्या शरीराचा भाग समजतच नाहीत. त्यामुळे मनाचं आरोग्य बिघडले तर सायकोलॉजिस्टकडे जाणे त्यांना कमीपणाचे वाटते.
तर हे सर्व सांगण्याचा उद्देश हा की, मोहालीमध्ये एंजल डिसुझा या 21 वर्षीय तरूणीने एक अनोखे कॅफे सुरू केले आहे. ही तरूणी सायकॉलॉजीची विद्यार्थिनी आहे. तेव्हा तिने 3 इडियट हा सिनेमा पाहिला होता, त्यानंतर तिने लोकांच्या मानसिक आरोग्या बाबत काम करण्याचा निर्णय घेतला होता. 3 इडियट्स या सिनेमामध्ये अभ्यासाच्या, सोसायटीच्या प्रेशरमुळे एक तरुण मुलगा आत्महत्या करतो हे दाखवण्यात आले होते.
https://www.instagram.com/p/CXDgiNzP3pQ/?utm_source=ig_web_copy_link
‘अनैक लव्हिंग लायब्ररी’ : ९ वर्षीय अनैकने कोव्हिड पेशन्टचे एकटेपण दूर करण्यासाठी सुरू केली मिनी लायब्ररी
लॉक डाऊन होते. ह्या काळामध्ये देखील बऱ्याच लोकांनी आत्महत्या केल्या, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. या सर्वांचे कारण म्हणजे डिप्रेशन, नैराश्य. आणि हे डिप्रेशन समजून न घेणारे कुणीही नसणं ही त्यापेक्षाही दुखद आहे.
म्हणूनच एंजलने हे कॅफे चालू केले आहे. ‘युवर शुगर डॅडी’ असे एकदम अनोखे नाव तिने आपल्या कॅफेचे ठेवले आहे. या कॅफेमध्ये थेरपी सेशन्स घेतले जातात. एकमेकांसोबत बोलण्यासाठी ग्रुप्स बनवले जातात. आयुष्य सकारात्मक दृष्टीने कसं जगावं, आपले मानसिक प्रॉब्लेम्स कसे स्वीकारावेत यााबद्दल बरेच सेशनसुद्धा तिथे कंडक्ट केले जातात. तर इंटरनेटवर सध्या एंजलचे हे कॅफे प्रचंड व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App