विशेष प्रतिनिधी
वेस्ट बंगाल : कोरोनाचा ज्वर आता काहीसा कमी झालेला आहे तर लग्नाचा सिजन सुरू झालेला आहे. लग्नाच्या सीझनचा थाट काही वेगळाच असतो पण लग्नाच्या सीझनमध्ये आणखी एक मोठा प्रॉब्लेम असतो ते म्हणजे लग्न समारंभात उरलेले जेवण वाया जाणे.
Inspirational: leftover meal at the wedding was distributed among the needy by this Bengali woman
आपल्या आजूबाजूला आपण पाहतो, कोणताही कार्यक्रम असला आणि जेवण उरले तर ते बऱ्याच वेळा वाया जाते. आपण गरजू व्यक्तींना हे जेवण देण्याचा विचार करतो पण आपल्या हातून तशी कोणतीही कृती होत नाही.
https://www.instagram.com/p/CXD6jMMlZJ2/?utm_source=ig_web_copy_link
बायकोला जगभर फिरवून आणणाऱ्या केरळमधील चहाविक्रेत्याचा मृत्यू, पर्यटनाची आवड पाहून आनंद महिंद्रांनीही केली होती मदत
सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बंगालमधील एका स्त्रीचा हा व्हिडिओ आहे. रात्री 1 वाजता ती फुटपाथवर बसून गरजू लोकांना प्लास्टिक प्लेटमधून जेवण देत आहे असे दिसून येत आहे. तिच्या भावाचे लग्न होते तर रिसेप्शन नंतर उरलेले जेवण तिने गरजू व्यक्तींना दिले आहे. लग्नातील फोटोग्राफर निरंजन मोंडल जेव्हा त्याच रस्त्याने जात होता, तेव्हा त्याला ही स्त्री दिसली. आणि त्याने तिचे काही फोटो काढून फेसबुकवरील ‘फेसबुक वेडिंग फोटोग्राफर्स ग्रुप’ या ग्रुपवर शेअर केले.
या स्त्रिने गरजू लोकांना अन्न दिलेच, त्याचप्रमाणे लोकांनाच एक आदर्श देखील घालून दिला आहे. आणि ही एक सकारात्मक गोष्ट आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App