Sonia Game : राहुल गांधींचे नेतृत्व INDI आघाडीवर लादण्यासाठी पुढाकार; पण निवडणूक आयोगाला सहीचे प्रतिज्ञापत्र द्यायला राहुलची माघार!!

Rahul Gandhi

नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व INDI आघाडीवर लादण्यासाठी पुढाकार; पण निवडणूक आयोगाला सहीचे प्रतिज्ञापत्र द्यायला राहुलची माघार!!, हे सोनिया गांधी प्रणित राजकीय सत्य आजच्या मत चोरी प्रकरणाच्या खासदारांच्या मोर्चावरून सिद्ध झाले. Rahul Gandhi

मतांची चोरी झाल्याचा कांगावा करून राहुल गांधींनी खासदारांच्या मोर्चाचे नेतृत्व केले, पण त्याची पायाभरणी सोनिया गांधींच्या बुद्धीने राहुल गांधींच्या घरातच भरली गेली होती. राहुल गांधींनी विरोधी पक्षनेत्यांच्या सरकारी निवासस्थानात मतचोरी प्रकरणाचे भले मोठे प्रेझेंटेशन केले. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा मागे बसून “मत चोरी” नावाचा “सिनेमा” पहावा लागला. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या तर्कहीन मुद्द्यांना पाठिंबा द्यावा लागला. यामागे “सोनिया बुद्धी” कार्यरत होती. कारण मतचोरीच्या तर्कहीन मुद्द्याला सुद्धा एवढी हवा देता येऊ शकते आणि त्यातून एवढी वातावरण निर्मिती करता येऊ शकते ही “राहुल बुद्धी” निश्चितच नव्हती, ती त्यापलीकडची “सोनिया बुद्धी” होती. त्यामुळे मत चोरीचा सोनिया गांधींनी दिग्दर्शित आणि राहुल गांधी प्रदर्शित सिनेमा सगळ्या विरोधकांना एकत्रित येऊन पाहावा लागला. त्याचा प्रतिवादही त्यांना करता आला नाही.



– राहुल गांधींच्या मागे बड्या नेत्यांची फरफट

हे सगळे राजकीय नाट्य फक्त राहुल गांधींच्या घरच्या प्रेझेंटेशन वर थांबले नाही.‌ त्या पाठोपाठ आज राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सगळ्या बड्या नेत्यांना आजच्या 300 खासदारांच्या मोर्चात सामील व्हावे लागले. पोलिसांच्या बस मध्ये बसून राहुल गांधींच्या शेजारी उभे राहून किंवा बसून फोटो काढावे लागले. यातून सोनियांनी विरोधकांवर लादलेले राहुल गांधींचे नेतृत्व जास्त ठळक झाले.

– प्रतिज्ञापत्रावर सही करायला राहुलचा नकार

पण त्याच वेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना नोटीसा पाठवून मत चोरी संदर्भात स्वतःच्या सहीचे प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले, ते मात्र राहुल गांधींनी आज उघडपणे नाकारले. 300 खासदारांच्या मोर्चाचे नेतृत्व करून संसदेत परत आल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकारांना मोर्चाची माहिती दिली. पण पत्रकारांनी विचारलेल्या प्रतिज्ञापत्राच्या प्रश्नाला मात्र बेधडकपणे बगल दिली. मी कशाला स्वाक्षरी करू?? तो निवडणूक आयोगाचा डेटा आहे. तो डेटा त्यांनी वेबसाईटवर टाकावा. त्यावर माझी सही कशाला पाहिजे?? निवडणूक आयोगाचा डेटा फसवा आहे. त्याचा लवकरच स्फोट होईल. पर्दाफाश होईल, असा दावा राहुल गांधींनी केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर नेहमीचच फायरिंग केले, पण निवडणूक आयोगाने मागितलेल्या प्रतिज्ञापत्रावर मात्र सही करायला नकार दिला. निवडणूक आयोगाच्या कायद्याच्या कचाट्यातून स्वतःची मान सोडवून घेतली. सोनिया गांधींचे राजकीय चलाखी राहुल गांधींच्या अशी कामी आली.

Initiative to impose Rahul Gandhi’s leadership on INDI front

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात