भारतीय औषध कंपनी वॉकहार्डटने २०० कोटी कोरोना प्रतिबंधक लसी बनविण्याची तयारी केंद्र सरकारकडे दाखविली आहे. फेब्रुवारी २०२२ पासून महिन्याला ५० कोटी लस निर्मितीची क्षमता होऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय औषध कंपनी वॉकहार्डटने २०० कोटी कोरोना प्रतिबंधक लसी बनविण्याची तयारी केंद्र सरकारकडे दाखविली आहे. फेब्रुवारी २०२२ पासून महिन्याला ५० कोटी लस निर्मितीची क्षमता होऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे.Indian pharmaceutical company Wockhardt plans to make Rs 200 crore corona vaccine, Rs 50 crore per month from February
वॉकहाडॅट कंपनीने केंद्र सरकारला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की कंपनीकडे निर्मिती आणि संशोधनाचीही क्षमता आहे. त्यामुळे एम आरएने प्रोटीन बेस्ड आणि व्हायरल व्हेक्टर बेस्टड लसी बनवू शकते.
केंद्र सरकारकडून वॉकहार्डटच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. त्यामुळे अद्याप मान्यता दिली नाही.मुंबईस्थित कंपनीने या महिन्याच्या सुरूवातीलाच आपला प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला आहे.
लसनिर्माच्या कंपनीसोबत भागिदारी करून लस निर्मिती सुरू करता येईल हे देखील केंद्र सरकारला विचारले आहे. लस निर्मितीचे तंत्रज्ञान मिळावे अशी मागणीही या कंपनीने केली आहे.
कंपनीने म्हटले आहे की एकाच प्रकारच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे २०० कोटी डोस बनविण्याची कंपनीची इच्छा नाही. त्यापेक्षा दोन तीन प्रकारच्या लसी बनविल्या तर त्या कायमस्वरुपी उपयोगी पडतील.
वॉकहार्डट कंपनीने यापूर्वीच ब्रिटन सरकारबरोबर करार केला आहे. केवळ ब्रिटनसाठी कोरोना प्रतिबिंधक लसीचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे.
ब्रिटनने आणिबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडावी यासाठी वॉकहार्डट कंपनीची एक प्रॉडक्शन लाईन राखीव करून ठेवली आहे. आॅक्सफर्ड अॅस्ट्राजेनेकाच्या १०० कोटी लसी बनविण्यासाठीही वॉकहार्डटने करार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App