विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – देश सामूहिक प्रतिकारक्षमतेच्या (हर्ड इम्युनिटी) जवळ पोचला असल्याने कोरोना संसर्गाची तिसरी लाट ही फारशी तीव्र नसेल.’’ असा अंदाज आयआयटी कानपूरमधील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. संसर्गाची तिसरी लाट साधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळामध्ये येण्याची शक्यता असल्याचे आयआयटीचे प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनी सांगितले. हा अंदाज वर्तविण्यासाठी ‘सूत्र’ मॉडेलचा वापर करण्यात आला होता. India will enter in herd immunity
नवा व्हेरिएंट हा ऑगस्टच्या अखेरीस आला तर तो डेल्टापेक्षाही अधिक वेगाने प्रसारित होईल. यामुळे तिसरी लाट ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये येऊ शकते. या लाटेची पहिल्या लाटेशी तुलना करता येऊ शकते. तिसऱ्या लाटेमध्ये ५ ते २० टक्के लोक त्यांची प्रतिकारक्षमता गमावू शकतात. याच लोकांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे.
‘एम्स’मधील औषधनिर्माण विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज निश्चंल यांनी सणासुदीच्या काळामध्ये लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यवक असल्याचे सांगितले. देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम असल्याचे सांगतानाच त्यांनी धार्मिक सण आणि उत्सवांचा हेतू हा आनंद वाटणे हा असून कोरोना नव्हे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App