आयआयटीच्या तरुणांकडून ऑक्सिजन वाचवण्यासाठी भन्नाट शक्कल, नव्या उपकरणामुळे प्राणवायूची मोठी बचत

विशेष प्रतिनिधी

चंडीगड – पंजाबमधील आयआयआयटी, रोपारमधील संशोधकांनी रुग्णाच्या श्वाच्छोश्वासादरम्यान सिलिंडरमधून पुरविला जाणारा ऑक्सिजन नियंत्रित करणारे उपकरण विकसित केले आहे. हे अशा प्रकारचे पहिलेच उपकरण आहे. IIT unvilles new oxygen saver

हे उपकरण रुग्णाला श्वास घेताना आवश्यक ऑक्सिजन पुरविते तर श्वास सोडताना ऑक्सिजन पुरवठा तात्पुरता थांबविला जातो. त्यामुळे, श्वास सोडताच्या क्षणी ऑक्सिजन वाचविला जातो. ॲम्लेक्स नावाचे हे उपकरण विशेषतः ऑक्सिजन सिलिंडरसाठी विकसित करण्यात आले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी अनेक पटींनी वाढली होती. या उपकरणामुळे विनाकारण वाया जाणारा ऑक्सिजन वाचेल. हे उपकरण वीजेवर तसेच बॅटरीवरही वापरता येऊ शकते. रुग्णाच्या श्वास घेण्याच्या व सोडण्याच्या प्रक्रियेनुसार सिलिंडरमधून होणारा ऑक्सिजन पुरवठा नियंत्रित केला जातो.

त्यामुळे, सिलिंडरमधील ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर बचत होते. ‘ॲम्लेक्स’ हे उपकरण ऑक्सिजन पुरवठा होणारा सिलिंडिर किंवा पाइप व रुग्णाच्या मास्कला सहज जोडता येते. या उपकरणात सेन्सरचा वापर केला असून सेन्सर रुग्णाच्या श्वासोच्छश्वासाचे निदान करतो. श्वास घेताना ऑक्सिजन पुरविला जातो तर सोडताना तात्पुरता थांबविला जातो.

IIT unvilles new oxygen saver

महत्त्वाच्या बातम्या