व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये पंतप्रधान मोदींचं विधान
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या सर्व देशांचे पंतप्रधान मोदींनी आभार मानले आहेत. यावेळी ते म्हणाले की, भारत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल तोपर्यंत तो विकसनशील देश नसून विकसित देश होईल, असे लक्ष्य आम्ही ठेवले आहे.India will be among the top 3 economies of the world this is my guarantee
मोदी म्हणाले की, आजचा हा २५ वर्षांचा कार्यकाळ हा भारताचा अमृतकाळ आहे. नवीन स्वप्ने, नवीन संकल्प आणि रोजच्या नवीन यशाचा हा काळ आहे. या अमृत काळातील हे पहिले व्हायब्रंट गुजरात समिट आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. या शिखर परिषदेसाठी आलेले 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी हे भारताच्या विकास प्रवासातील महत्त्वाचे सहकारी आहेत. मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो.
तसेच काही काळापूर्वी भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती, मात्र येत्या काही दिवसांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि ही मोदींची हमी आहे. असेही ते म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले की मित्रांनो, यूएईचे अध्यक्ष बिन झैद या कार्यक्रमाला उपस्थित राहणे ही आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. व्हायब्रंट गुजरातच्या या शिखर परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती भारत आणि UAE यांच्यातील वाढत्या सौहार्दपूर्ण संबंधांचे प्रतीक आहे. त्यांचा भारतावरचा विश्वास आणि त्यांचा पाठिंबा खूप सकारात्मक आहे. व्हायब्रंट समिट हे आता जागतिक व्यासपीठ बनले आहे. या शिखर परिषदेत भारत आणि UAE यांनी फूड पार्क आणि अक्षय संसाधनांसाठी अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App