“आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांपैकी एक असेल” – पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास!

भारत मंडपम हे भारताच्या भव्यतेचे आणि इच्छाशक्तीचे दर्शन असल्याचेही म्हणाले आहेत.

विशेष  प्रतिनिधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कम कन्व्हेन्शन सेंटर संकुल  ‘भारत मंडपम’ राष्ट्राला समर्पित केले. कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, प्रत्येक भारतीयाला ‘भारत मंडपम’ पाहून आनंद आणि अभिमान वाटतो. भारत मंडपम हे भारताच्या सामर्थ्याचे, भारताच्या नवीन उर्जेचे आवाहन आहे. भारत मंडपम हे भारताच्या भव्यतेचे आणि इच्छाशक्तीचे दर्शन आहे. तसेच, यावेळी भारत आमच्या तिसऱ्या कार्यकाळात जगातील टॉप-३ अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला. In our third term India will be one of the top3 economies in the world PM Modi believes

याचबरोबर पंतप्रधान म्हणाले की, आजचा दिवस प्रत्येक देशवासियांसाठी ऐतिहासिक आहे. आज कारगिल विजय दिवस. देशाच्या शत्रूंना भारतमातेच्या सुपुत्रांनी आपल्या शौर्याने पराभूत केले. संपूर्ण देशाच्यावतीने मी कारगिल युद्धात बलिदान दिलेल्या प्रत्येक वीराला श्रद्धांजली अर्पण करतो.

मोदी म्हणाले की, ‘भारत मंडपम’ या नावामागे भगवान बटेश्वरच्या अनुभव मंडपमची संकल्पना आहे. हे बांधकाम थांबवण्यासाठी नकारात्मक विचार करणाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, त्यांनी न्यायालयाच्या चकराही मारल्या. प्रत्येक चांगल्या कामात अडथळे आणण्याची व अडवणूक करण्याची काही लोकांची प्रवृत्ती असते.

आमच्या पहिल्या काळात भारत जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर होता. दुस-या टर्ममध्ये भारत जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या स्थानावर आला. मी ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे सांगत आहे की आमच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या तिसऱ्या क्रमांकावर असेल.

आज जग स्वीकारत आहे की भारत ही ‘लोकशाहीची जननी’ आहे. आज आपण स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना ‘अमृत महोत्सव’ साजरा करत आहोत, तेव्हा हा ‘भारत मंडपम’ ही आम्हा भारतीयांनी आपल्या लोकशाहीला दिलेली एक सुंदर भेट आहे. काही आठवड्यांनंतर येथे G20 शी संबंधित कार्यक्रम होणार आहेत. जगातील बड्या देशांचे प्रमुख येथे उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण जगाला भारताची वाढती पावले आणि भारताची वाढती उंची या ‘भारत मंडपम’मधून दिसेल. असंही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

In our third term India will be one of the top3 economies in the world PM Modi believes

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात