अफगाणिस्तानला भारताची मदत, वाघा बॉर्डरहून ५० हजार टन गहू आणि औषधे नेणार, मार्ग वापरू देण्यास पाकिस्तानही तयार

India help to Afghanistan: 50 thousand tonnes of wheat and medicines will be taken from Wagah border, Pakistan has decided

India help to Afghanistan : भारताने संकटग्रस्त अफगाणिस्तानला मानवतावादी मदत म्हणून ५० हजार मेट्रिक टन गहू आणि जीवनरक्षक औषधे देण्याची घोषणा केली होती. अलीकडेच पाकिस्तानने ही मदत अपवादाच्या आधारे आपल्या देशातून नेण्यास परवानगी देण्याचे जाहीर केले होते. ही मदत पुढे नेण्याच्या मार्गावरून दोन्ही देशांमध्ये वादही पाहायला मिळाला. India help to Afghanistan: 50 thousand tonnes of wheat and medicines will be taken from Wagah border, Pakistan has decided


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताने संकटग्रस्त अफगाणिस्तानला मानवतावादी मदत म्हणून ५० हजार मेट्रिक टन गहू आणि जीवनरक्षक औषधे देण्याची घोषणा केली होती. अलीकडेच पाकिस्तानने ही मदत अपवादाच्या आधारे आपल्या देशातून नेण्यास परवानगी देण्याचे जाहीर केले होते. ही मदत पुढे नेण्याच्या मार्गावरून दोन्ही देशांमध्ये वादही पाहायला मिळाला.

गुरुवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी वाघा बॉर्डरपासून तोरखामपर्यंत भारताने दिलेली ही मदत घेऊन जाण्यासाठी आम्ही अफगाण ट्रक्सचा वापर करू, असा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पाकिस्तानशी चर्चा सुरू असल्याचे भारताने गुरुवारी सांगितले होते.

भारताला मदतीसाठी प्रयत्न जलद करण्याची विनंती

परराष्ट्र मंत्रालयाने पुढे सांगितले की, भारताच्या चार्ज डी अफेअर्सला या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानने भारत सरकारला आवश्यक पावले उचलण्याची आणि अफगाणिस्तानला मानवतावादी मदत त्वरित पोहोचवण्यासाठी वेगाने पुढे जाण्याची विनंती केली आहे. मानवतावादी मदत अटींच्या अधीन नसावी, असे भारताने याबाबत म्हटले होते.

पाकने गुरुवारी भारताचा प्रस्ताव नाकारला होता

विशेष म्हणजे, गुरुवारी ही मदत अफगाणिस्तानला नेण्याची भारताने केलेली ऑफर पाकिस्तानने धुडकावून लावली होती. मात्र, शुक्रवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात याला सहमती दर्शवली आणि वाघा सीमेवरून ही मदत अफगाणिस्तानला दिली जाईल, असे सांगितले.

India help to Afghanistan 50 thousand tonnes of wheat and medicines will be taken from Wagah border, Pakistan has decided

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात