ममतांसारखे बोलणे ठीक, पण काँग्रेसला शून्यवत करणे अखिलेश यादव यांना जमेल??


उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आज पहिल्यांदाच एक महत्त्वाचे राजकीय विधान केले आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे आणि तो हल्लाबोल साधा नाही. उत्तर प्रदेशात भाजप सत्तेवरून जाईलच, पण काँग्रेसला तिथे शून्य जागा मिळतील, असा दावा अखिलेश यादव यांनी झाशी मध्ये समाजवादी विजय यात्रेत केला आहे.Can akhilesh yadav do a magic to bring congress to zero in U P?पण ममता बॅनर्जी यांच्या सारखे बोलणे वेगळे आणि त्यांच्यासारखी कृती करून दाखवणे निराळे!! ममता बॅनर्जी यांनी सलग तीन निवडणुका पश्चिम बंगालमध्ये जिंकून दाखविले आहेत. काँग्रेस तिथे हळूहळू संपत गेली आहे आणि अखेरचा टोला ममता बॅनर्जी यांनी 2021 विधानसभा निवडणुकात लगावला आहे आणि म्हणून बंगाल विधान सभेत काँग्रेस शून्यावर पोहोचली आहे. त्यानंतरच ममता बॅनर्जी यांची राजकीय महत्त्वाकांक्षा उफाळून ती राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे आणि त्यांनी शरद पवार यांच्या साथीने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचे राजकीय अस्तित्वच पुसून टाकले आहे.

अर्थात ममता बॅनर्जी यांच्या नुसत्या बोलण्याने यूपीएचे अस्तित्व पुसले जात नाही किंबहुना पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वकर्तृत्वाने जरी काँग्रेसला शून्यवत केले असले तरी काँग्रेस नेतृत्वाने स्थानिक पातळीवर जोर लावला नाही आणि तिथे डाव्या पक्षांशी युती करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाचा हा निर्णय चुकला आहे म्हणून तिथे काँग्रेस शुन्यवत झाली आहे.

उत्तर प्रदेशातली राजकीय स्थिती अशी अजिबात नाही पश्चिम बंगाल अशी तिची तुलना होऊ शकत नाही. एक तर उत्तर प्रदेशात भाजप प्रचंड बहुमताने सत्तेवर आहेत. काँग्रेस तिथे चौथ्या क्रमांकावर असली तरी संघटनात्मक पातळीवर पक्षाचे अस्तित्व निश्चित दखल घेण्याजोगे आहे आणि खुद्द प्रियांका गांधी उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत लक्ष घालत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपुर मध्ये जाऊन त्यांना ललकार नेण्याची हिम्मत अखिलेश यादव यांच्या आधी प्रियंका गांधी यांनी दाखवली आहे. लखीमपुर हिंसाचाराचा मुद्दा अखिलेश यादव यांच्या अधिक प्रियांका गांधी यांनी उचलून धरला आहे. त्यांचे राजकीय टाइमिंग अखिलेश यादव यांच्यापेक्षा याबाबतीत उजवे ठरले आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांनी कितीही दावा केला तरी काँग्रेसला तिथे शून्यवत करणे ही सोपी गोष्ट नाही.

काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवताना अपेक्षित ताकद लावलेली नव्हती. ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांनी तितका उघडपणे पंगा घेतला नव्हता. पण उत्तर प्रदेशात तशी स्थिती नाही. प्रियांका गांधी एकाच वेळी योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांच्याशी टक्कर देण्याच्या स्थितीत आहेत. त्यांची तशी इच्छा तरी नक्की आहे. त्यामुळे काँग्रेसला बाकीचे सर्व विरोधी पक्ष आघाडी किंवा युती साठी जवळ करायला तयार नसले तरी खुद्द काँग्रेस नेतृत्व देखील बाकीच्या विरोधी पक्षांशी युती आणि आघाडी करायला उत्सुक नाही. किंबहुना स्वबळावर संघटनात्मक बळकटी आणून निवडणूक लढवायला इच्छुक आहे.

प्रियांका गांधी यांचे प्रयत्न त्या दृष्टीने सातत्याने होताना दिसत आहेत. बंगालमध्ये त्या निवडणुकीपुरते गेल्या, पण उत्तर प्रदेशात फक्त निवडणुकीपुरते त्या लक्ष घालत नाहीत तर आधीपासून त्या उत्तर प्रदेशात गावागावांमध्ये आणि शहरा शहरांमध्ये फिरताना दिसत आहेत. याचा अर्थ काँग्रेसला लगेच मोठा विजय प्राप्त होईल असा नाही, पण अखिलेश यादव यांच्या दाव्यानुसार काँग्रेस लगेच शून्यवत होईल अशी स्थिती येण्याची शक्यता फार कमी आहे.

Can akhilesh yadav do a magic to bring congress to zero in UP?

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात