चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स, पु. ना. गाडगीळ या नामांकित ज्वेलर्स शॉपमध्ये चोरी करणाऱ्या महिलेला अटक


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स, पु. ना. गाडगीळ या नामांकित ज्वेलर्स शॉपमध्ये एका महिलेने हातचलाखीने चोरी केल्याची पोलिसांकडे तक्रार गेली होती. त्यानंतर पोलिस या महिलेचा शोध घेत होते. पोलिसांना आता सीसीटीव्हीच्या मदतीने या महिलेला अटक करण्यात यश आले आहे. संबंधित महिला याआधी अष्टेकर ज्वेलर्समध्ये सेल्समन म्हणून काम करायची. तेथे तिला सोन्याच्या दुकानात काम करण्याचा अनुभव होता. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांवर स्टिकर कसे लावायचे याची सर्व माहिती तिला होती.

A woman was arrested for stealing from a reputed jewelers shop chandu kaka Saraf & Sons & Pu. Na. Gadagil

आपल्या याच अनुभवाचा फायदा घेत ही महिला सोन्याच्या दुकानांमध्ये जायची. सेल्समनला कधी चहा तर कधी पाणी द्या असे सांगून त्याचे लक्ष विचलित करायची. आणि खऱ्या अंगठीच्या ऐवजी खोटी अंगठी ठेवून निघून यायची. मोठमोठ्या ज्वेलरी शॉपमध्ये झालेल्या या चोरीमुळे पोलिसांनी या महिलेवर पाळत ठेवली होती.


Pune Coronavirus Vaccination : दिवाळीत पुण्यात तीन दिवस लसीकरण बंद!; शुक्रवारी सकाळच्या सत्रात लसीकरण होणार


सीसीटीव्हीच्या आधारे या महिलेची चेहरेपट्टी, हावभाव, चालण्याची पद्धत याचा पोलिसांनी अभ्यास केला. मगरपट्टा ते हडपसर नंतर बिबेवाडी पर्यंत असे अनेक ठिकाणचे फुटेज पोलिसांनी पाहिले. तेव्हा बिबवेवाडी पर्यंत ही महिला गेल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी तिला अटक केली.

अष्टेकर ज्वेलर्समध्ये जेव्हा ही महिला काम करायची. त्या ठिकाणी देखील तिने चोरी केली होती. त्यामुळे तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तिच्या नावावर चोरीचा गुन्हा देखील दाखल झाला होता.

A woman was arrested for stealing from a reputed jewelers shop chandu kaka Saraf & Sons & Pu. Na. Gadagil

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण