वृत्तसंस्था
नवी दिल्ली : इस्रायल-पॅलेस्टाईनने संघर्षाची भूमिका सोडावी आणि मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहन भारताने केले. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत इस्रायलवर ईद दिवशी रॉकेट हल्ले चढविणारी पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासचा निषेधही केला आहे. India condemns rocket attack on Israel, Leave the conflict; Appeal to Israel-Palestine
गेल्या काही दिवासांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्ष सुरु आहे. पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने प्रथम इस्रायलवर ईद दिवशी जिहाद पुकारून भयंकर रॉकेट हल्ले चढविले. त्यानंतर इस्रायलने त्याला जशाच तसं उत्तर द्यायला सुरुवात केली.
त्यामुळे हा भडका उडाला आहे. इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा भारताने निषेध करून तणाव कमी करावा आणि शांतता प्रस्तापित करावी, असे आवाहन केल आहे.
भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत दोन्ही देशांना हे आवाहन भारताने केले आहे. दोन्ही देशांनी आधीची ‘जैसे थे’ ही परिस्थिती कायम ठेवावी असेही आवाहन करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमचे प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी सांगितलं की, गाझामधून ज्या पद्धतीने इस्रायलवर रॉकेट हल्ले करण्यात आले. त्याचा भारत निषेध करतो. या हल्ल्यात इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या एका भारतीयाचा जीव गेल्याचंही तिरुमूर्ती यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App