India – China : चिनी सैन्य मागे घेतले तरच पुढची चर्चा; अजित डोवालांनी चिनी परराष्ट्र मंत्र्यांना सुनावले!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनने लडाख परिसरातील नियंत्रण रेषेवरील आपले सैन्य आधी माघारी घ्यावे. तरच पुढची चर्चा करता येऊ शकेल, अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना सुनावले आहे.india – China: Next discussion only if Chinese troops withdraw

भारत आणि चीन या दोन देशांच्या सैन्यामध्ये 2019 मध्ये लडाखमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे प्रथमच भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांना अजित डोवाल यांनी स्पष्ट शब्दात पुढच्या चर्चेबद्दल सुनावले आहे. या दौऱ्यात वांग यी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात शिष्टमंडळ स्तरावर दीड तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यान जोपर्यंत चीनचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून हटवले जाणार नाही तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार नाही, असे अजित डोवाल यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.



सुरक्षिततेला धक्का पोहोचवू नका

चिनी सैन्य पूर्णपणे मागे घेण्याची गरज असून यातूनच दोन्ही राष्ट्रांमधील संबंध योग्य मार्गावर येतील, असे डोवाल यांनी सांगितले. चर्चेदरम्यान भारताने, सीमेवर शांतता आणि तणावमुक्त परिस्थिती प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक, लष्करी पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू ठेवण्यावर भर दिला. कोणत्याही कृतीमुळे परस्पर सुरक्षिततेच्या भावनेला धक्का पोहोचणार नाही. याची काळजी घेण्यास डोवाल यांनी सांगितले आहे.

आधी तातडीचे प्रश्न सोडवू नंतर चीन भेट

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अजित डोवाल यांना चीन भेटीचे निमंत्रण दिले आहे. यावर डोवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीचे प्रश्न यशस्वीरित्या सोडवल्यानंतर चीनला भेट देऊ असे सांगितले. शांतताच परपस्पर विश्वास निर्माण करेल, असेही डोवाल यांनी पुन्हा एकदा चिनी परराष्ट्र मंत्र्यांना सांगितले.

india – China: Next discussion only if Chinese troops withdraw

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात