विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपविरोधी ‘इंडिया’ आघाडीतील जागावाटपाची दिल्लीत सुरू असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. पंजाब व दिल्लीतील 20 जागांवर सहमती झाल्यानंतर काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील 168 जागांचे गणित सोडवण्यावर भर दिला. महाराष्ट्रातील सध्याची स्थिती लक्षात घेता काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांना प्रत्येकी 20-20 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची 8 जागांवर बोळवण होण्याचे संकेत आहेत.India Aghadi formula for Lok Sabha was decided, Congress-Uddhav Sena 20 seats each, NCP 8 seats
देशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा उत्तर प्रदेशात आहेत. तिथे भाजपविरोधात प्रबळ उमेदवार उभा करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. सूत्रांनी सांगितले की, या राज्यात भाजपला तुल्यबळ लढत द्यायची असेल तर मायावतींच्या बसपाला घेण्यावर ‘इंडिया’चा भर असेल. या 80 पैकी 76 जागांवर बोलणी सुरू आहेत. 4 जागा गांधी घराण्याच्या आहेत. या वेळी वरुण आणि मनेका गांधीही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नाहीत, असे विरोधी पक्षाला वाटते. अशा स्थितीत रायबरेली, अमेठीव्यतिरिक्त पिलीभीत व सुलतानपूरबाबतही सामूहिक निर्णय घ्यावे लागतील. उर्वरित जागांसाठी काँग्रेस समाजवादी पार्टीसोबत चर्चा करणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने बसपाला सोबत न घेतल्यास ही लढत तिरंगी होईल आणि भाजपचा मार्ग सुकर होईल. सपा कोणत्याही परिस्थितीत बसपाशी चर्चेच्या विरोधात आहे. अशा स्थितीत बसपालासोबत घेत काँग्रेसने सपासोबत जागांबाबत वाटाघाटी करण्याची रणनीती आखली आहे. म्हणजे केवळ स्वत:साठीच नाही तर राष्ट्रीय लोकदल आणि बसपासाठीही जागा मागण्याचा फॉर्म्युला काँग्रेसने तयार केला आहे.
बिहार : आरजेडी- जेडीयूला प्रत्येकी 16 जागा
बिहारमध्ये जागावाटपात यश आल्याची बातमी आहे. राज्यातील 40 जागांपैकी राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (यू) यांना प्रत्येकी 16 जागा मिळू शकतात, तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी 8 जागांवर निवडणूक लढण्याचे मान्य केले आहे.
दिल्ली-पंजाबात काँग्रेस-आपला निम्म्या-निम्म्या जागा
दिल्ली-पंजाबच्या 20 जिल्ह्यांमध्ये काँग्रेस आणि आपला 50-50 टक्के जागा मिळू शकतात. पंजाबमध्ये काँग्रेस 6-7 जागा लढवणार आहे, तर आप दिल्लीत 3-4 जागा लढवणार असल्याचे समजते. भूमिका मवाळ करत ‘आप’ने गोवा, गुजरात आणि हरियाणामधून प्रत्येकी एक जागा मागितली आहे. पुढील बैठकीत जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल.
भाजपने 24 जागांवर 35 टक्क्यांहून अधिक आणि 40 टक्क्यांपेक्षा कमी फरकाने विजय मिळवला होता. 23 जागा 40 ते 49 टक्के अशा फरकाने जिंकल्या. नवसारी, सुरत आणि कर्नालमध्ये 50 टक्क्यांहून अधिक मतांनी विजय मिळाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App