भाजप मधल्या बड्यांना परस्पर माध्यमांचीच तिकीटे; लोकसभेसाठी दुबळ्या सूत्रांचे आडाखे!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना उतरवणार असल्याचे दावे करत माध्यमांनीच आज “तिकीट वाटप” करून टाकले आहे. सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राम सातपुते राहुल नार्वेकर आदी नेत्यांना लोकसभा निवडणुकीत उतरविण्यात येईल, असे दावे त्यांच्या मतदारसंघांसकट माध्यमांनी केले आहेत. त्यासाठी अर्थातच नेहमीप्रमाणे माध्यमांनी त्यांच्या सूत्रांचे हवाले दिले आहेत, जी सूत्रे नेहमीच भाजपच्या बाबतीत दुबळी ठरली आहेत.Media’s kite flying over the issue of tickets to ministers in loksabha elections 2024

कारण या माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेली भाजप संदर्भातली एकही बातमी 2014 नंतर यशस्वी ठरलेली नाही. असे असतान महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचे परस्पर तिकीट वाटप करताना माध्यमांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतल्या तिकीट वाटपाचा फॉर्म्युला लक्षात घेतला आहे. भाजपने मध्य प्रदेशात पहिली 78 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये 3 केंद्रीय मंत्री आणि 7 खासदार यांचा समावेश केला. मध्य प्रदेशसाठी भाजपने विशिष्ट स्ट्रॅटेजी आखली आणि त्यातून वर उल्लेख केल्याप्रमाणे केंदीय राजकारणात असलेल्या नेत्यांचा मध्य प्रदेशच्या राजकारणात समावेश केला. आता तोच फॉर्मुला महाराष्ट्रात भाजप वापरणार असल्याचा दावा करून माध्यमांनी लोकसभेचे “तिकीट वाटप” करून टाकले आहे.*वास्तविक मध्य प्रदेशची यादी प्रत्यक्षात जाहीर होण्यापूर्वी एकाही माध्यमाला भाजप 3 केंद्रीय मंत्र्यांनी 7 खासदारांना मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची तिकिटे देईल, याची साधी भनकही लागली नव्हती. तशा बातम्या कुठेही सूत्रांच्या हवाल्याने देखील माध्यमे देऊ शकली नव्हती.*आता केवळ मध्य प्रदेश मध्ये भाजपने केंद्रीय मंत्री आणि खासदार उतरविले याचा अर्थ महाराष्ट्रातील तोच फॉर्म्युला किंवा रिव्हर्स फॉर्म्युला वापरून भाजप महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत उतरविणार असल्याचा दावा माध्यमे करत आहेत.

वास्तविक भाजपची कुठलीही स्ट्रॅटेजी ही मोदी शहांच्या काळात उघड होतच नाही. माध्यमांमध्येही त्याची खरीशचर्चा कुठल्याच सूत्रांच्या हवाल्याने घडवूही दिली जात नाही. त्यामुळे त्यामुळे माध्यमांच्या बातम्या त्यांच्या विशिष्ट सूत्रांमधून असल्या तरी त्या फुसक्या ठरतात. आताही महाराष्ट्रातला माध्यमांनी सांगितलेला फॉर्म्युला असाच सूत्रांच्या हवाल्याने दिलेला आहे. त्यात तथ्य किती??, ती सूत्रे भाजपच्या अंतर्गत वर्तुळात पोहोचलीत किती?? या विषयी दाट शंकाच आहे. त्यामुळे भले माध्यमांनी सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राहुल नार्वेकर, राम सातपुते, नितीन केळकर, रवींद्र चव्हाण यांना माध्यमांनी परस्पर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले असेल, पण भाजप प्रत्यक्षात त्यांनाच तिकीट देऊन लोकसभा निवडणूक लढवेलच याची कोणालाही गॅरंटी नाही.

Media’s kite flying over the issue of tickets to ministers in loksabha elections 2024

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात