बांगलादेशात मंदिरांवरील हल्ल्यांत दुपटीने वाढ; तेथील हिंदूंना दूर्गापूजेची चिंता, सरकारसमोर पेच


वृत्तसंस्था

ढाका : बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक चार महिन्यांवर आली आहे. त्यातच या वर्षात 30 मंदिरांवर हल्ले झाले आहेत. गेल्या वर्षी 15 घटना झाल्या होत्या. या महिन्यात तीन मंदिरांवर हल्ले झाले आहेत. दुर्गामूर्ती खंडित केल्या गेल्या. मंदिरांवरील हल्ल्यामागे कट्टरवादी संघटना हिफाजत-ए-इस्लाम व जमातचा हात असल्याचा आरोप हिंदू अल्पसंख्याक संघटनेने केला आहे.Temple attacks double in Bangladesh; There, Hindus are worried about Durga Puja, the screw in front of the government

बांगलादेश पूजा समितीचे उपाध्यक्ष महेंद्रकुमार नाथ म्हणाले, 14 ऑक्टोबरपासून दुर्गापूजन आहे. परंतु सव्वा कोटीहून जास्त हिंदूंसमोर एक प्रश्न आहे, दुर्गापूजा शांततेने करता येईल का? देशात यंदा ३२ हजारांहून जास्त मंडप सज्ज आहेत. निवडणुकीच्या वर्षात मतांच्या ध्रुवीकरणासाठी कट्टरवादी संघटनांना हल्ल्यासाठी उचकवले जात आहे.



यातून अल्पसंख्याक हिंदूंमध्ये भीती निर्माण व्हावी आणि ते मतदानापासून लांब राहावेत किंवा विशिष्ट पक्षालाच त्यांनी कौल द्यावा यासाठी कारवाया होत आहेत, असे नाथ यांनी सांगितले. रंगपूर जिल्ह्यातील रहिवासी जोई सरकार म्हणाले, बांगलादेशातील लोकसंख्येत हिंदू केवळ ८ टक्के आहेत. सरकार आमच्या सुरक्षेबद्दल गंभीर नसते. चांदपूर येथील कुटुंबातील इतर सदस्यही घाबरले आहेत. काही भागांत हिंसाचार सुरू झाला आहे. हिंदू आेकिया संघटनेचे सरचिटणीस राणा दासगुप्ता म्हणाले, हिंदू संघटनांनी सरकारच्या आश्वासनानंतर ३२ हजार दुर्गा मंडळाची स्थापना केली. परंतु ही संख्या खूप जास्त आहे. कारण सरकार या सर्व मंडळांना सुरक्षा देऊ शकणार नाही. हिंदूंनी मंडळांची संख्या कमी करावी.

‘सरकारच्या आश्वासनावर आमचा विश्वास नाही’

कुसतिया कुमारखालीचे रहिवासी मलय दत्ता म्हणाले, सरकारने सुरक्षेचे आश्वासन दिले जाते. परंतु ते आता आम्हाला सवयीचे झाले आहे. सत्ताधारी-विरोधक आरोप-प्रत्यारोप करतात आणि नंतर कुठेतरी हल्ला होतो. आमचा सरकारवर विश्वास नाही. सरकारने हल्ल्यामागील खऱ्या आरोपींना अटक केली पाहिजे.

मूर्तिकार सकाळी आले तेव्हा मूर्तीची विटंबना, मंदिराचीही तोडफोड

फरीदपूरमध्ये 19 सप्टेंबरला मूर्तिकार सकाळी परतले. तेव्हा त्यांनी बनवलेल्या दुर्गा मूर्ती खंडित अवस्थेत दिसून आल्या. शेरपूर व रामेश्वरमध्येही 17 सप्टेंबरला दुर्गा मंदिरात तोडफोड झाली होती. यंदा फेब्रुवारीपासून मंदिरांवर हल्ल्यांची सुरुवात झाली. ठाकूरगावात एकाच रात्री 14 मंदिरांवर हल्ला झाला होता. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही.

Temple attacks double in Bangladesh; There, Hindus are worried about Durga Puja, the screw in front of the government

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात