पाकिस्तानात 2 आत्मघाती हल्ल्यांत 59 जणांचा मृत्यू; ईदच्या मिरवणुकीसाठी जमले होते लोक

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : शुक्रवारी पाकिस्तानात दोन ठिकाणी 2 स्फोट झाले. पहिला स्फोट बलुचिस्तानमधील मस्तुंग शहरातील एका मशिदीजवळ झाला. हा आत्मघाती हल्ला होता. यामध्ये डीएसपींसह 55 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जण जखमी झाले. हल्ला झाला त्यावेळी लोक ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीसाठी जमले होते.59 killed in 2 suicide attacks in Pakistan; People had gathered for the Eid procession

दुसरा स्फोट खैबर पख्तूनख्वामधील हांगू शहरातील एका मशिदीत झाला. हा देखील आत्मघातकी हल्ला होता. येथे एका पोलीस अधिकाऱ्यासह चौघांचा मृत्यू झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, स्फोट झाला तेव्हा मशिदीत नमाज अदा करण्यात येत होती. यानंतर मशिदीचे छत कोसळले. येथे 30-40 लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. 12 जणांची सुटका करण्यात आली आहे.



यापूर्वी हंगू शहरात दोन स्फोट झाल्याची बातमी आली होती. एक पोलिस ठाण्याच्या बाहेर आणि एक मशिदीच्या आत. आता पोलीस ठाण्याच्या बाहेर कोणताही स्फोट झाला नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. तिथे पोलीस अधिकाऱ्यांनी स्फोटापूर्वीच स्टेशनमध्ये घुसलेल्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला.

खैबर पख्तूनख्वा पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले – दोन दहशतवादी पोलिस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही एकाला मारले आणि दुसरा पळून गेला. पळून गेलेला हा दहशतवादी आत्मघातकी हल्लेखोर होता, ज्याने जवळच्या मशिदीवर हल्ला केला होता.

बलुचिस्तान बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना सरकार उपचार देणार आहे

पहिला स्फोट बलुचिस्तानच्या मस्तुंग शहरात झाला. येथील सहायक आयुक्तांनी सांगितले की, डीएसपी नवाज गिश्कोरी यांच्या गाडीजवळ हा स्फोट झाला. जिओ न्यूजनुसार, या हल्ल्यात ज्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला ते डीएसपी नवाज आहेत.

बलुचिस्तानचे कार्यवाहक माहिती मंत्री जान अचकझाई यांनी सांगितले की, सर्व जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. गरज पडल्यास त्यांना कराचीला हलवण्यात येईल. जखमींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी सरकार घेईल.

59 killed in 2 suicide attacks in Pakistan; People had gathered for the Eid procession

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात